आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापांजरापपोळ येथे ठेवण्यात आलेल्या उंटांच्या प्रकृतीवर शहराच्या वाढत्या तापमानासह त्यांच्या आहार-विहारात होत असलेल्या बदलाचा परिणाम होत आहे. परिणामी गेल्या ७ दिवसांत ८ उंटांचा मृत्यू झाल्याचे प्राणी अभ्यासकांनी नाेंदविले आहे.
दरम्यान शनिवारी (दि. १३) पांजरापपोळ येथे अाणखी एका उंटांचा मृत्यू झाला. अातापर्यंत पांजरापपोळ येथे ७ तर मालेगावच्या गाेशाळेत एका उंटाचा मृत्यू झाला आहे.
नक्की प्रकरण काय?
आठ दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर उंट आढळून आले. हे सर्व उंट कत्तलसाठी नेले जात असल्याचा संशयावरुन प्राणीमित्रांनी पांजरपाेळ येथे १११ उंट दाखल केले. तर मालेगाव येथे देखील ४३ उंट तेथील गाेशाळेत दाखल आहेत. या सर्व उंटांना गुजरातमधील राजचंद्र मिशन या संस्थेच्या मदतीने राजस्थान येथे पाठविण्यात येणार आहे. या उंटांना राजस्थान येथे पाठविण्यासाठी पशुसंवर्धवन विभागातून लसीकरण करण्याबराेबरच टॅर्गिंग देखील पूर्ण करण्यात आले आहे.
राजस्थानातील महावीर कॅमल सेंचुरी या संस्थेकडे हे सर्व उंट सुपूर्द केले जाणार आहेत. अशी परिस्थिती असतांना दुसरीकडे ७ दिवसात मात्र अाठ उंटांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमाेर नवी चिंता निर्माण झाली आहे.
आठ दिवस उलटूनही मालक सापडेना
शहरात एवढ्या माेठ्या प्रमाणात उंट आढळल्याने त्याची चाैकशी करत या उंटांच्या मालकांचा शाेध घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र आठवडाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप मालक सापडलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आहार-विहाराचाही उंटांवर परिणाम
वातावरण, भाैगाेलिक परिस्थिती हे कारण तर आहेच. मात्र त्यांच्या आहार आणि विहारातही मोठ्या प्रमाणात बदल झाला. काही उंटांच्या छातीमध्ये इन्फेक्शनही झाल्याची शक्यता आहे. तसेच खूप चालणे, काही उंटांचे वय हाेणे अशी काही कारणेही या उटांच्या मृत्यूमागे असल्याची प्राथमिक शक्यता आहे. - डाॅ. सचिन वेंदे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नाशिक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.