आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहरासह जिल्ह्यात आढळून आलेले सर्व १५१ उंट हे राजस्थान येथे रवाना करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गुजरातमधील प्राण्यांसाठी कार्यरत असलेले श्रीमद राजचंद्र मिशनच्या सहकार्याने प्रशासन या उंटांना राजस्थान येथे पाठवणार आहे.
विशेष म्हणजे सर्व उंटांचे लसीकरण करण्यात येऊन टॅगिंग करण्यात येणार आहे.
नक्की प्रकरण काय?
तपाेवन परिसरात १११ उंट आढळून आले होते. कत्तलीसाठी हे उंट नेण्यात येत असल्याचा संशय प्राणिप्रेमींकडून व्यक्त होत होता. याच पार्श्वभूमीवर प्राणिप्रेमींनी उंट हे पांजरापाेळ येथील गाेशाळेमध्ये पाेहचविले होते. याचप्रमाणे मालेगाव येथे देखील ४२ उंट होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते.
या उंटांसाठी राजस्थानातील वातावरणच अनुकूल असल्याने तेथील एका संस्थेत त्यांना पाठविण्यात येत आहे. त्यासाठी गुजरातमधील राजचंद्र मिशन ही संस्था मदत करणार असून गुरुवारी (दि. ११) या संस्थेचे पदाधिकारी माहिती संकलित करणार आहेत.
राजचंद्र मिशनच्या वतीने राजस्थानमधील एका संस्थेचे नाव उंटांचा सांभाळ करण्यासाठी सुचविण्यात आले आहे. त्यादृष्टीने लसीकरण व टॅगिंग करत उंटांना रवाना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. - नरेशकुमार बहिरम, तहसीलदार, नाशिक
तीन उंटांचा झाला मृत्यू
पांजरापोळ येथील गाेशाळेत ठेवण्यात अाल्याने १११ उंटापैकी ३ उंटांचा मृत्यू झाला आहे. यामुळे उर्वरित १०८ व मालेगाव येथे आढळून आलेले ४३ असे १५१ उंट राजस्थान येथे पाठवण्याबाबत प्रशासनाकडून नियाेजन करण्यात येत आहे. लसीकरण व टॅगिंग पूर्ण करत आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
उंटाच्या मालकांचा शोध लागेना
शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या या उंटाचे मालक काेण, हे उंट कुठे नेण्यात येणार होते या प्रश्नांचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही.
उंटाची वाहतूक पायीच
राजस्थानला उंटांची वाहतूक ही पायीच केली जाणार आहे. उंटांची संख्या व त्यांना पायी चालण्याची सवय या सर्व गाेष्टी लक्षात घेण्यात अाल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.