आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सून पूर्व तयारी जिल्ह्यात सुरू झाली असली तरीही रुग्णालयात लागणाऱ्या आगी, कोरोना संसर्गाची संभाव्य शक्यता पाहता आपत्ती व्यवस्थापनला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. बिटको रुग्णालयात सिटी स्कॅन व एमआरआय मशीन सुसज्ज ठेवावे. अग्निशमन विभागाने सतर्कता ठेवावी. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, पावसाळा सुरु झाला असून बचाव व मदत कार्यासाठी 'एनडीआरएफ' पथकासोबत काम करा. आणखी मदत हवी असल्यास लष्कराच्या पथकाशी संपर्कात रहा. अतिवृष्टीमुळे अनेक वृक्ष उन्मळून पडतात. आज वृक्ष कोसळून दोघांचा मृत्यू झाला. ते पाहता धोकेदायक वृक्ष असल्यास ते दूर करा जेणेकरुन दुर्घटना घडणार नाही अशा सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या. तसेच काही गावांना पुराचा फटका बसतो. ते पाहता बोटी सुसज्ज ठेवा. त्या नादुरुस्त असल्यास त्याची दुरुस्ती करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
धरणांतून विसर्ग हळूहळू वाढवा
पावसाळ्यात गोदेला पुरपरिस्थिती टाळण्यासाठी गंगापुर धरणातून जलसंचय पाहून पाणी सोडा. धरण पूर्ण भरण्याची वाट पाहू नका. अन्यथा अचानक पाणी सोडल्यावर पूर संकट येऊ शकते, अशा सूचना त्यांनी जिल्हाप्रशासनाला दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.