आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्वल:12 ते 14 वयोगटच्या लसीकरणात नाशिक शहर राज्यात अव्वल ; पहिला डोस 84.60 तर दुसरा 46.68% बालकांनी घेतला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीवर रामबाण उपाय म्हणजे लसीकरण आणि त्यावरच केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. बालकांचेही लसीकरणास वेगाने सुरू असून १२ ते १४ वयोगटांतील नाशिक जिल्ह्याने संपूर्ण राज्यात ८४.६० टक्के बालकांच्या लसीकरणासह पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ४६.६८ टक्के बालकांनी दुसरा डोसही घेतला आहे. गेल्या दोन वर्षांमधील अनुभवानुसार सरकारने शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. त्यातच बालकांच्या लसीकरणाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. नाशिक जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटांतील एक लाख ८७ हजार ७४९ म्हणजेच ८४.६० टक्के बालकांचे लसीकरण झाले, असून यातील एक लाख ३ हजार ५५९ म्हणजेच ४२.६८ टक्के बालकांनी दुसराही डोस घेतला आहे. १२ वयापेक्षा पुढील एकूण लोकांचे लसीकरणाचे प्रमाण पाहता महाराष्ट्रात नाशिक जिल्हा चौदाव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ५० लाख ८० हजार १३० म्हणजेच ८८.८९ टक्के नागरिकांनी कोरोनाचा पहिला दोष घेतला आहे. तर ४२ लाख १७ हजार ५९७ म्हणजेच ७३.४७ टक्के नागरिकांनी दुसराही डोस घेतला आहे विशेष म्हणजे एक लाख २८ हजार नागरिकांचे बूस्टर डोसही घेऊन झाला आहे. अजूनही जवळपास २६ टक्के लोकांचा दुसरा डोस घेणे बाकी असून १० टक्के लोकांनी पहिला डोस देखील घेतला नाही.

बातम्या आणखी आहेत...