आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:२३२ जणांनी दिली लाेकसेवा आयोगाची कृषी‎ अधिकारी मुख्य परीक्षा‎,

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक‎ राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने‎ कृषी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी‎ घेण्यात अालेल्या मुख्य परीक्षेला २३२‎ उमेदवारांनी हजेरी लावली. १६ जण‎ गैरहजर राहिले.‎ आयोगाच्या वतीने महाराष्ट्र कृषी‎ सेवेची पूर्वपरीक्षा यापूर्वीच घेण्यात‎ आली होती.

त्याच वेळी मुख्य‎ परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात‎ आली होती. त्यानुसार ही शनिवारी‎ (दि. १३) नाशिकमध्ये एका केंद्रावर‎ परीक्षा पार पडली. दोन सत्रात ही‎ परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये पहिला‎ पेपर हा सकाळी ११ ते १२ या दरम्यान‎ घेण्यात आला तर दुसरा पेपर हा दुपारी‎ ३ ते ४ वाजेदरम्यान घेण्यात आला. या‎ परीक्षेसाठी एकूण २४८ विद्यार्थी‎ नाशिकमध्ये पात्र ठरले होते. परंतू‎ दोन्ही पेपरला प्रत्येकी १६ विद्यार्थ्यांनी‎ दांडी मारली. त्यामुळे दोन्ही पेपरला‎ प्रत्येकी २३२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावत‎ परीक्षा दिला.‎