आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मनपाकडून गोदावरी पात्राची स्वच्छता मोहीम:संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पालिकेकडून अनोखे अभिवादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हातात खराटा घेत स्वच्छता करत संत गाडगे बाबा यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला हाेता. याच पार्श्वभूमीवर संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त पालिकेच्या पंचवटी विभागातर्फे मंगळवारी दि. 20 गोदावरी,वाघाडी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. या माेहिमेच्या माध्यमातून तब्बल 3 टन कचरा संकलित करण्यात आला.

संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत पालिकेच्या वतीने या स्वच्छता माेहिमेचे आयाेजन करण्यात आले हाेते. पालिका आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्या आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलाेड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका उपायुक्त विजयकुमार मुंढे ,विभागीय अधिकारी कैलास राबड़िया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या प्रमुख उपस्थित बुरड डोह,हत्ती पुल, गणेशवाडी, संजय नगर,वाल्मिकी नगर,साबळे वाडा ढिकले नगर पर्यंत वाघाडी नदी व गोदावरी नदीच्या कन्नमवार पुल ते लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत नदी पात्राच्या कडेच्या परिसर तसेच विभागातील सप्तरंग,मोरेमला,शिवसमर्थ नगर,दुर्गा नगर,गोरक्ष नगर,ओमकार नगर इत्यादि परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या माेहीमेत साधारणत: 3 टन प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा करुण घंटागाडीमार्फत उचलून घेण्यात आला. मलेरिया विभागामार्फत नदी परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

तसेच प्रभागातील व बुरडवाडी, वाल्मीक नगर,गणेशवाडी, वाघाडी,ढिकले नगर पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना नदी पात्रात कचरा न टाकता विलगिकरण करुण घंटागाडीत देण्याबाबत व प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापराबाबत जनजागृती करण्यात आली.

विशेष स्वच्छता मोहिमेत स्वच्छता निरीक्षक दुर्गादास मालेकर,उदय वसावे, दीपक चव्हाण,किरण मारू,मुकादम बी के पवार, संजय मकवाना आदीसह त्यांचे 6 कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 158 व वॉटरग्रेस प्रोड्क्टसचे 23 स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता माेहिमेचे नागरिकांकडून काैतूक करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...