आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढाई न्यायाची:आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंना काँग्रेसचा पाठींबा, मेणबत्ती मोर्चा काढून सरकारचा निषेध

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी गेल्या अनेक दिवसांपासून जंतर-मंतर दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नाशिक शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी पुढे सरसावले आहेत.

नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने या खेळाडूंना समर्थन देण्याकरिता शालिमार येथील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कॅण्डल मार्च करून या खेळाडूंच्या समर्थनार्थ महिला काँग्रेसने पुढाकार घेतला, नाशिक शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वातीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, मप्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी मेणबत्ती पेटवून या खेळाडूंना समर्थन दिले तसेच भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंग यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल होऊन त्यांना कटोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून काल करण्यात आली.

याप्रसंगी भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे सरकार खासदार ब्रिज भूषण सिंग यांना वाचवण्याकरता त्यांना पाठीशी घालत आहे व या खेळाडूंवर अन्याय केला जातो आहे, देशाचं नाव जगभर प्रसिद्ध करणाऱ्या या खेळाडून बरोबर काँग्रेस पक्ष कायम उभा राहील असे मत शहराध्यक्ष एडवोकेट आकाश छाजेड यांनी व्यक्त केले. या काँग्रेसच्या वतीने या खेळाडूंना न्याय नाही मिळाला तर राज्यस्तरावर महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाईल

शहर अध्यक्ष आकाश छाजेड, जैष्ट नगरसेविका वत्सला खैरे, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, एनएसयुआय चे अध्यक्ष अल्तमश शेख, ज्ञानेश्वर काळे, ओबीसी सेल अध्यक्ष गौरव सोनार, जावेद इब्राहिम, प्रा. प्रकाश खळे, फारूक मन्सूरी, स्मिता भोसले, मीरा साबळे, अरुणा आहेर, वृंदा शेरे, सोफीया सिद्दिकी, कुसुम चव्हाण, सुमन पगारे, आशा मोहिते, एलिझाबेथ सत्यंन, उषा साबळे, पदाधिकारी उपस्थित होते.