आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे, अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यावधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले एलआयसी चे 39 कोटी गुंतवणूकदारांचा व स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का अशी भीती निर्माण झाली आहे.
एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्ग नोकरदार छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे, परंतु मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे ,अदानी समूहातील गैर कारभारामुळे एलआयसीच्या गुंतवणूकदारांचे 33 हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे, तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे
काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही परंतु खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे
अदानी समूहातील आर्थिक गैर कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती तर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी म्हणून नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एलआयसी ऑफिस ,गडकरी चौक ,नाशिक. येथे आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर ,माजी मंत्री शो ताई बच्छाव, प्रदेश प्रवक्त हेमलता पाटील ,गटनेते शाहू खैरे,
काॅंग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग जिल्हा अध्यक्ष श्री.शरद बोडके, उद्धव पवार, बबलू खैरे, विजय पाटील, स्वप्नील पाटील ,अण्णा मोरे,ज्ञानेश्वर चव्हाण,अनिल बहोत,राजकुमार जेफ, वैभव शेलार, दाऊद शेख,इमरान अन्सारी, पवन भगत ,जावेद शेख, जावेद पठाण,अनिल बेग,राजेंद्र सोनवणे ,गोपाळशेठ जगताप, आदि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.