आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत:अँटिजेन कीट खरेदीत सीईओंनी वाचवले दोन कोटी वीस लाखस रुपये, एका सदस्याचा होता खरेदीसाठी आग्रह, जीइएम पोर्टलद्वारे केले दर कमी

प्रतिनिधी | नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाची तिसरी लाट जानेवारीत येण्याची शक्यता असल्याने केंद्र व राज्य शासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. यानिमित्ताने औषध खरेदीसह अँटिजेन कीट खरेदी करण्यात येणार आहे. ठराविक एजन्सीकडून कीट खरेदीचा सदस्यांचा आग्रह माेडीत काढत जीइएम पाेर्टलद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसाेड यांनी दाेन काेटी २० लाख रुपयांची बचत केली. संबंधित सदस्याने सुचवलेल्या एजन्सीने एका कीटसाठी ८९ रुपयांचा दर दिला हाेता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्यामुळे एका कीटसाठी १७ रुपये ५६ पैसे असा दर ठरविण्यात आला आहे.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर आराेग्य विभागाच्या वतीने औषध व साहित्य खरेदी केली जात आहे. शासनाने एचएलएल लाइफ केअर या कंपनीमार्फत औषधी व साहित्य खरेदी करण्याचे परिपत्रक २४ मार्च २०२० राेजी काढले हाेते. मात्र, संबंधित कंपनी अँटिजेन कीट बनवत नसल्याने त्यांनी नाशिकच्या सार्थक एजन्सीला ऑर्डर देण्याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले हाेते.

मात्र, काेराेनाची लाट ओसरलेली असताना संबंधित एजन्सीने दिलेले दर जादा वाटत असल्याने औषध निर्माण अधिकारी विजय देवरे यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तरीही संबंधित एजन्सीकडूनच खरेदी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने केली हाेती. ती मागणी मान्य हाेत नसल्याने काही संबंध नसलेल्या एका हस्तकाने थेट औषधनिर्माण अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर केला.

इतकेच नव्हे तर तुम्ही सीईओंशी काय बाेलता त्याचे सीडीआरच मागवताे अशी धमकीही दिली. संबंधितांचा हेतू लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून नेहमीप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांसमाेरच पारदर्शकपणे कीटचे दर कमी करण्यासाठी चर्चा केल्याने शासनाचे दाेन काेटी २० लाख रुपये वाचले.

दर कमी करण्यासाठी दाेन तास चर्चा
साेमवारी दुपारी जीइएम पाेर्टलवर दर कमी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तब्बल दाेन तास विविध एजन्सींसाेबत चर्चा केली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. कपिल आहेर, औषधनिर्माण अधिकारी विजय देवरे उपस्थित हाेते.

११ काेटी ५० लाख‌ांना मान्यता
काेराेनाच्या काळात औषध खरेदी करण्यासाठी ११ काेटी ५० लाख रुपयांना मान्यता देण्यात आली. यापैकी तीन लाख अँटिजेन कीट खरेदी करण्यासाठी दाेन काेटी ७० लाख रुपयांना मान्यता देण्यात आली हाेती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी पारदर्शकपणे शासनाचे चक्क दाेन काेटी २० लाख रुपये वाचवले आहेत.
केंद्राच्या आयसीएमआर लॅबची मान्यता
जीइएम पाेर्टलद्वारे खरेदी केलेल्या अँटिजेन कीटला केंद्राच्या आयसीएमआर लॅबची मान्यता आहे. १५ सप्टेंबरला मनपाच्या वतीने ४५ रुपयाप्रमाणे अँटिजेन कीट खरेदी केले आहेत. तेच कीट १७ रुपये ५६ पैशाला जि.प.ला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...