आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाशिक:सातच्या आत या घरात, आजपासून कडक अंमलबजावणी, विनाकारण फिराल तर दाखल हाेईल गुन्हा 

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाेलिस अशी ठेवणार नजर....

नाशिक शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरच्या ते सव्वाशेच्या सरासरीने वाढत आहे. तसेच मृतांमध्ये केवळ वृद्धच नव्हे तर तरुण अन् मध्यमवयीन नागरिकांचीही संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने आजपासून (दि. १ जुलै) सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दरम्यान विनाकारण घराबाहेर पडल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला असून, गर्दीच्या ठिकाणी नो व्हेइकल झोन जाहीर केले जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषित केले. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांच्याशी मंगळवारी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, पोलिस उपायुक्त अशोक तांबे, पोलिस सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर १८८ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी आवश्यक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीची मुदत वाढविण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवांसाठी पोलिस परवानगी आवश्यक राहणार आहे. नागरिकांनी पोलिस ठाण्याचे संकेतस्थळ आणि व्हॉटस अॅप नंबरवर ऑनलाइन अर्ज केल्यास परवानगी दिली जाणार आहे. तसेच आयुक्तालयात कोरोना कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि बाहेर जाण्यासाठी पोलिस परवानगी आवश्यक राहणार आहे. नागरिकांना http://Corona.nashikcitypolise.gov.in या संख्येत स्थळावर ऑनलाइन अथवा व्हॉटसअप नंबर ७२४८९०६८७७, ७२४८९०३८७७ या नंबरवर देखील अर्ज करून परवानगी देण्यात येणार आहे.

काेराेनाचा शहरात वेगाने संसर्ग वाढत आहे. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे. गेल्या आठवड्यातील व्यापारी संघटनांच्या बैठकीतदेखील व्यावसायिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहेच. तरीदेखील आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. - छगन भुजबळ, पालकमंत्री

पाेलिस अशी ठेवणार नजर....

- आजपासून शहरात सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन.

- यातून जीवनावश्यक बाबींशी संबंधित व्यक्ती तसेच रात्रपाळीवरील औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांना वगळण्यात आले आहे.

- अशा व्यक्तीने आपले ओळखपत्र तसेच कामाची निकड पोलिस अधिकाऱ्यांना समजावून देणे गरजेचे राहील.

- कोणी गैरफायदा घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कठोर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

0