आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:फायर ऑडिट झाले, कोणी नाही पाहिले! अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, रुग्णांमध्ये चिंता

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षाच रुग्णशय्येवर : नाशिक रोड कोविड सेंटर

“आधी कोरोनाची भीती वाटत होती, आता अजून काही वाढवा होऊ नये याची भीती वाटू लागली आहे,’ नाशिकरोड कोरोना सेंटरच्या आवारात बसलेले पंकज सोनवणे सांगत होते. गेल्या पाच दिवसांपासून त्यांची आई येथे उपचार घेत आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमध्ये कोरोना रुग्ण दगावल्यानंतर या रुग्णालयातील कोविड वॉर्डातील रुग्णांच्या मनातील भीती अधिकच वाढली आहे. रुग्णालयात आलो नाही तर बरे कसे व्हायचे आणि रुग्णालयात आलो तर घरी सुरक्षित जाऊ का अशा दुहेरी कात्रीत ते सापडले आहेत. याचे फायर अाॅडिट झाल्याचे अधिकारी सांगतात, पण त्याचे प्रमाणपत्र मात्र कुणाकडेच नाही!

नाशिकरोड परिसरातील तब्बल ७२० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या बिटको रुग्णालयानजीकच्या नाशिकरोड कोविड सेंटरची इमारत तशी नवी कोरी. खरेतर कोविडमुळे उद्घाटनाआधीच रुग्णांच्या सेवेत आलेली. या प्रशस्त इमारतीत अग्निरोधक यंत्रणाही तेवढीच प्रशस्त आहे. भले मोठे पाइप, पाण्याची टाकी, सूचना फलक, अग्निरोधक. सारे सज्ज. मात्र, याच्या उपयुक्ततेबाबतचे फायर ऑडिटच अद्याप झालेले नाही. येथील कर्मचाऱ्यांचे फायरचे प्रशिक्षण झाले ते ही नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या फायर अाॅडिटबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम अाहे.

विद्युत विभागाचे ऑडिट पूर्ण
या कोविड सेंटरमध्ये विद्युत विभागाने सहा कर्मचारी तैनात केले असल्याचे विद्युत अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले. अद्याप ही इमारत नवीन असल्याने इलेक्ट्रिकबाबत समस्या उद‌्भवत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तरीही दक्षता म्हणून पंधरा दिवसांपूर्वीच विद्युत विभागाचे आॅडिट केल्याचे ते म्हणाले.

खासगी रुग्णालयांना सक्ती, स्वत:च्या रुग्णालयांना माफी
फायर सेफ्टीबाबत नाशिक महापालिका प्रशासन खासगी रुग्णालयांचा छळ करीत असल्याच्या अनेक तक्रारी अाहेत. या प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाच्या नावाने सातत्याने अडवणूक होत असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेच्या स्वत:च्या रुग्णालयांची फायर सेफ्टी मात्र अशी वाऱ्यावर सोडल्याचे येथे पहायला मिळाले. फायर सेफ्टीची कोट्यवधींची यंत्रणा येथे दिमाखात उभी आहे, मात्र तिच्या वापराचे प्रशिक्षण दिले दोन आठवड्यांपूर्वी! आगीसारख्या आपत्तींच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या “कोड रेड’ टीमची, त्यांच्या निकषांची कुणालाच माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...