आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशयास्पद:21 दिवसांत पाइप तुटलाच कसा?; ठेकेदाराऐवजी पालिकेनेच काम करण्याचे स्थायी समितीने दिले होते आदेश

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांची कसून चाैकशी करा

बिटकाे रुग्णालय, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयासह डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयात अाॅक्सिजन टाक्या बसवण्यापासून तर तेथे अखंडित अाॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी तब्बल दहा वर्षांकरिता पुण्यातील टायाे निप्पाॅन सन्साे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे काम साेपवले गेले. मात्र, या कंपनीने काम सुरू करून जेमतेम २१ दिवस उलटत नाहीत ताेच टाकीचा पाइप तुटून अाॅक्सिजन गळती झाल्यामुळे निकृष्ट साहित्य बसवले गेल्याचा संशय गडद झाला अाहे. एवढेच नव्हे तर देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी याच कंपनीची असताना जेव्हा घटना घडली तेव्हा जागेवर कंपनीचे तंत्रज्ञ नसल्याचे समाेर अाले अाहे. पालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी स्वत: रेड कॅपखालील मेन व्हाॅल्व्ह बंद केल्याचे सांगितल्यामुळे कंपनीचे तंत्रज्ञ या काळात काेठे हाेते, हे चाैकशीचे प्रमुख मुद्दे असणार अाहेत. या कंपनीला अाॅक्सिजन पुरवठ्याचे काम देण्यासाठी पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘पुणे कनेक्शन’ वापरल्याची यापूर्वीच चर्चा असताना ताेही संदर्भ बुधवारच्या दुर्दैवी घटनेनंतर दिला जात हाेता.

गेल्या वर्षी काेराेनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर बिटकाे रुग्णालयात २० केएल तर डाॅ. हुसेन रुग्णालयात १० केएल तसेच मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात ३ केएल क्षमतेच्या दाेन अाॅक्सिजन टाक्या बसवण्याचा निर्णय झाला. विद्यमान विभागीय अायुक्त राधाकृष्ण गमे हे पालिकेचे अायुक्त असताना प्रक्रिया सुरू झाली व पालिकेचे अाताचे अायुक्त कैलास जाधव यांनी ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया अंतिम केली. या टाक्या बसवण्यास विलंब हाेत असल्यामुळे स्थायी समितीत सदस्यांनी टीकाही केली हाेती. तसेच स्थायी समितीने लाखाे रुपये भाड्यावर देण्याएेवजी स्वमालकीच्या टाक्या घेण्याचा निर्णय घेतला हाेता, मात्र प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न करता संबंधित कंपनीला मक्ता देण्यात धन्यता मानली.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, १५ मार्चच्या सुमारास डाॅ. हुसेन रुग्णालयातील अाॅक्सिजनचे अाॅपरेशन सुरू झाल्यानंतर अवघ्या २१ दिवसांत पाइप नादुरुस्त झालाच कसा हा प्रश्न अाहे. दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी संबंधित काम कंपनीला दिले असताना सव्वा महिन्यातच जर साहित्य खराब हाेत असेल तर त्याचा दर्जा काय, असाही प्रश्न उपस्थित हाेत अाहे. यंत्रसामग्रीच्या दर्जाबाबत अाॅडिट करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त हाेत अाहे. दुसरी बाब म्हणजे, जेव्हा पाइप नादुरुस्त हाेऊन गळती सुरू झाली तेव्हा तंत्रज्ञ जागेवर नसल्याचे समाेर अाले अाहे.

ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांची कसून चाैकशी करा
स्थायी समितीकडून कार्याेत्तर मंजुरी अर्थातच काम झाल्यानंतर मंजुरी घेतली गेली. मुळात, महिनाभरापूर्वी टँकचे अाॅपरेशन सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच बिघाड हाेण्याची बाब संशयास्पद अाहे. त्यामुळे मक्तेदार तसेच या कामाकडे दुर्लक्ष करणारे अतिरिक्त अायुक्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांची चाैकशी करणे गरजेचे अाहे. - गणेश गिते, सभापती, स्थायी समिती

दरम्यान, जालना येथून तसेच अहमदनगर येथून ऑक्सिजन मागवला जात आहे. मात्र मागील तीन दिवसांपूर्वी आलेला ऑक्सिजन आता सकाळपर्यंतच पुरणार आहे. तर कळमनुरी व हिंगोलीतील औंढा रोड भागात रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा आहे. तर वसमत येथील टँक रिकामा झाल्याने येथे ४ ड्युरा सिलिंडरमधून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होत आहे. दरम्यान, हिंगोलीत तुटवडा जाणवत असला तरी रुग्णांना पुरेल एवढा साठा ड्युरा सिलिंडरमध्ये असल्याने घाबरून जाऊ नये, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले अाहे.

बातम्या आणखी आहेत...