आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रेमडेसिविरविना रुग्णांना जीवदान देणारा डॉ.बावस्कर पॅटर्न; ही वेळ सेवा आणि संशोधनाची, पैसे कमावण्याची नाही : डॉ. बावस्कर

नाशिक9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोवर आणि रुबेला या विषाणूंमधील 60% अमोनो ॲसिड कोरोना विषाणूसारखेच असल्याचे त्यांना कळले

विंचूदंशावरील उपचारांबाबत जागतिक नावलौकिक मिळवलेले डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी १३ महिन्यांपासून रेमडेसिविरचा एकदाही वापर न करता ६४० रुग्णांना बरे केले आहे. “ही वेळ पैसे कमावण्याची नाही, तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधन देण्याची आहे,’ असे ते मानतात. याच ध्यासातून वयाची सत्तरी ओलांडली असताना, उच्च रक्तदाब व थायरॉइडसारखी सहव्याधी असताना डॉ. बावस्कर यांनी या महामारीत एकही दिवस रुग्णालय बंद न ठेवता महाडमधील त्यांच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील यशस्वी उपचार सुरू ठेवले आहेत.

डिसेंबरमध्ये डॉ. बावस्करांनी अभ्यासाला सुरुवात केली. मार्चपर्यंत यावर प्रकाशित झालेली हजारो जर्नल्स वाचून काढली. गोवर आणि रुबेला या विषाणूंमधील ६०% अमोनो ॲसिड कोरोना विषाणूसारखेच असल्याचे त्यांना कळले. तेव्हा लस आली नव्हती, त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी त्यांनी व त्यांच्या पत्नीने बीसीजी आणि एमएमआर या लसी घेऊन कोरोना रुग्णांवर त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू केले. त्यांच्या कुटुंबीयांनाही फिजिकल डिस्टन्स, मास्कची सक्ती, सातत्याने स्वच्छता आणि नाकात आयोडिनचे ड्रॉप यासह प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपचार व प्रशिक्षण त्यांनी दिले. डॉ. बावस्करांनी पत्नी डॉ. प्रमोदिनी यांच्यासोबत आतापर्यंत ६५० रुग्णांवर उपचार केले असून त्यापैकी फक्त ११ रुग्ण दगावले आहेत. तेदेखील उशिरा आल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नसल्याचे ते सांगतात.

चार पथ्ये :

  • प्रत्येक रुग्णाच्या नाकावर मास्क सक्तीचा
  • एका वेळी एकच रुग्ण तपासण्यासाठी आत घेणे
  • कमीत कमी वेळात तपासून घरी पाठवणे
  • खोकत असलेल्या रुग्णांना प्राधान्याने तपासणे

चार उपचार :

  • नेब्युलायझरद्वारे मिथिलन ब्ल्यू
  • रुग्णाचे मनोबल वाढवणे
  • ऑक्सिजन
  • स्टिरॉइड्स

ना पीपीई किट ना रेमडेसिविर
डॉ. बावस्करांनी मास्क, शील्ड आणि ग्लोव्हज यांचा उपयोग केला. बीसीजी आणि एमएमआर या लसी घेतलेल्या असल्याने लहान मुलांना हा संसर्ग होत नसल्याचे त्यांच्या अभ्यासात आढळले. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पत्नीने स्वत:च्या प्रतिबंधासाठी या लसी घेतल्या आणि रुग्णसेवा सुरू ठेवली. ना पीपीई किट वापरले ना रेमडेसिविर दिले.

ऑक्सिजनची पातळी ६५% असताना डॉ. बावस्कर यांच्याकडे चालत आलेला हा रुग्ण. वैद्यकीय परिभाषेत हँपी आयपॉक्सिया म्हणतात. यास पालथे झोपून डॉ. बावस्कर यांनी स्टिरॉइड, ऑक्सिजन, अँटिव्हायरल आणि अँटी कोऑगुलंट याच्या उपचाराने त्याची ऑक्सिजनची पातळी ९५% पर्यंत वाढवली. कोरोना रुग्णांना पालथे झोपवून उपचार केल्यास, त्यांची फुप्फुसे वर येतात व ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

बातम्या आणखी आहेत...