आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटरबॉम्ब:इकडे कोरोना अन‌् तिकडे अधिकार का‘रोना’; अधिकार क्षेत्रावरून पोलिस आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांत जुंपली; नाशिककर वाऱ्यावर

नाशिक9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किराणा दुकानदाराला दंड, पोलिसांकडून आदेशाचा गैरवापर

शहराची कोरोना रुग्णवाढ देशात अव्वल समजली जात असताना ज्यांच्या हाती स्थानिक प्रशासनाच्या दोऱ्या आहेत त्या जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांमध्ये मात्र स्वतःच्या अधिकार क्षेत्रावरून विसंवादाचे सूर आळवले जात आहेत. आपल्या अधिकारांवर जिल्हाधिकारी हे अतिक्रमण करीत असल्याचा आरोप एका पत्राद्वारे करत पोलिस आयुक्तांनी नाराजी उघड केली आहे. एवढेच नव्हे तर एका शासन आदेशाचा संदर्भ देत जिल्हाधिकारी हे मुख्य सचिवांपेक्षा मोठे आहेत का, असा थेट सवालही पोलिस आयुक्तांनी पत्रात उपस्थित केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे नाशिककरांवर अत्यंत बाका प्रसंग गुदरला असताना दुसरीकडे महसूल आणि पोलिस या दोन्ही यंत्रणांचे प्रमुख मात्र अधिकार क्षेत्राच्या वादात अडकल्याचे चित्र यातून पुढे येते. साहजिकच अशा गंभीर स्थितीत नाशिककरांना वाली कोण?

किराणा दुकानदाराला दंड, पोलिसांकडून आदेशाचा गैरवापर
किराणा दुकान अत्यावश्यक सेवेमध्ये येत असताना पोलिसांकडून मनमानी करून दंड आकारण्यात येत आहे, अशी तक्रार उपनगर येथील दोन किराणा दुकानदारांनी केली आहे. याबाबत उपनगर पोलिसांकडून माहिती घेतली असता नेमका कुठल्या कारणासाठी दंड घेतला याची माहिती घेतली जाईल असे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांचे घ्यावे मार्गदर्शन....
मुख्य सचिवांच्या अादेशाची जिल्हाधिकारी पायमल्ली करीत असल्यामुळे त्यांचे अादेश बेकायदेशीर व जनतेला त्रास देणारे ठरत अाहेत. मुख्य सचिवांनी स्पष्टपणे अर्थच्रक चालले पाहिजे व काेराेनाचा अनर्थ टळला पाहिजे असे म्हटले असल्याकडे लक्ष वेधत पाेलिस अायुक्तांनी अाता जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांचे मार्गदर्शन घ्यावे अशीही काेपरखळी मारली अाहे. जनतेमध्ये राेषाचे वातावरण हाेत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे, असाही इशारा दिला अाहे. पत्राच्या शेवटी राज्याच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या अादेशाचे पालन करावे की जिल्हाधिकाऱ्यांचे याबाबतही पाेलिस व मनपा अायुक्तांना स्पष्टता व्हावी असे म्हटल्यामुळे काेराेनाच्या वाढत्या परिस्थितीत अधिकाराचा वाद किती शिगेला गेला अाहे हे स्पष्ट हाेते.

बातम्या आणखी आहेत...