आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्ल्युसिव्ह:एकाच लॅबमधून एकाच व्यक्तीचे दाेन रिपोर्ट, आदल्या दिवशी बाधित; दुसऱ्या दिवशी काेराेनामुक्त

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना किंबहुना प्रत्येक दाेन ते तीन व्यक्तीमागे एक व्यक्ती बाधित असल्यासारख्या शंका व्यक्त हाेत असताना एकाच व्यक्तीचे एकाच लॅबमध्ये आदल्या दिवशी काेराेनाबाधित व दुसऱ्या दिवशी काेराेनामुक्त असे अहवाल आल्यामुळे धक्का बसला आहे. एका खासगी हाॅस्पिटलमध्ये २७ मार्च राेजी दाखल झालेल्या एका ७५ वर्षीय महिलेला सुप्रीम या लॅबने काेराेनाबाधित ठरवले व संबंधित महिलेला काेणतीही लक्षणे नसल्यामुळे शंका घेत याच लॅबमधून फेरचाचणीचा आग्रह त्यांच्या मुलाने धरल्यानंतर ताे अहवाल २९ मार्च राेजी निगेटिव्ह आला. दरम्यान, पहिला अहवाल बाधित आल्यामुळे संबंधित महिलेला काेविड रुग्णालयात अन्य रुग्णांसाेबत भरती केल्यामुळे आता, पुन्हा काेराेनाची लागण झाली तर जबाबदार काेण? असा प्रश्न हेमंत अहिरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काेराेना चाचणीबाबत मध्यंतरी काही प्रवाद निर्माण झाले हाेते. काही अहवालांबाबत खुद्द पालिका प्रशासन तसेच जिल्हा रुग्णालयाने हरकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कारवाईसाठी पाऊल उचलले हाेते. मात्र, संबंधित लॅबने ठाेस उत्तर दिल्यानंतर प्रशासन बॅकफूटवर गेले. अलिकडेच, काेराेनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, दाेन ते चार व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यात साधारणत: एक बाधित असा ट्रेण्ड असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहे. अशातच लक्षणे नसलेल्या अनेक व्यक्ती बाधित येत असल्यामुळे त्यांना खराेखर लागण झाली की लॅबचा महिमा आहे अशीही शंका आहे.

बातम्या आणखी आहेत...