आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Corona Update;District Collector Suraj Mandhare Orders Closure Of Shops, Markets And Religious Places In The District On Saturday And Sunday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:शनिवार, रविवारी जिल्ह्यातील दुकाने, बाजारपेठा आणि धार्मिकस्थळे बंद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे आदेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरात विकेंडला होणारी नागरीकांची गर्दी आणि कोरोनाचा वाढता संसर्ग या दोन्ही बाबी विचारात घेता शनिवार व रविवारी शहरासह जिल्ह्यातील सर्वच दुकाने आणि बाजारपेठा आणि धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. यात मेडिकलसह सर्वच अत्यावशक वस्तू, आणि सेवा सुरु राहतील.

महिनाभरात नाशिकमधील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. मागील दोन आठवड्यात नवीन संसर्गितांचा आकडाही नियमितपणे पाचशे आणि सहाशेच्याच संख्येत येत आहे. ही आगामी धोक्याची घंटा असून, आरोग्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुधवारपासून (दि.१०) शहरासह जिल्ह्यात कोरोना सुरक्षेचे कडक व कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या दरम्यान हे निर्बंध अाहेत. सायंकाळी ९ वाजे पर्यंत बार, परमीट रुम, रेस्टॉरंट, हाॅटेल्स सुरु राहाणार आहेत. परंतू दर शनिवार व रविवारी नागरिक मोठया संख्येने बाहेर पडतात. माॅल, हाॅटेल व रेस्टारंट, पर्यटन व मनोरंजनाची ठिकाणे व खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होते.

त्यातही नागरिकाचे मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे या सुरक्षेच्या नियमांचे सरार्स उल्लंघन होत आहे. दंड आकारुनही नागरिक नियमांना पायदळी तुडवित आहेत. याच बाबींचा विचार करता कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी नियंत्रणासाठी तसेच वेगाने वाढणारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा पुढील आदेशापर्यंत अनिश्चित कालावधीसाठी बंद केल्या आहेत.
सोमवार ते शुक्रवार असे असतील निर्बंध

शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, बाजारापेठा बंद राहाणार असून, सोमवार ते शुक्रवार मात्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान सर्वच बाबी सुरु असतील. तर बार, परमीट रुम, खानावळ, मद्य दुकाने, हाॅटेल्स, रेस्टॉरंट बंद सकाळी ७ ते सायंकाळी ९ पर्यंत सुरु राहातील. दरम्यान पार्सल सुविधा किचन हे सायंकाळी १० पर्यंत सुरु ठेवता येईल. याव्यतिरिक्त इतर बाबीं या सात वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

हे राहणार सुरु

बाजारपेठा जरी बंद राहणार असल्यातरी जीवनावश्यक वस्तुंच्या सेवेची दुकाने सुरु राहणार आहेत. मेडिकल, रुग्णालये, किराणा दुकान, भाजीपाला, फळे, दुध व वृत्तपत्र वितरण, प्राणी दवाखाने आणि आैषधालये हे सुरुच राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...