आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:नाशकात कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या; पोलिसांचे नागरिकांना आवाहन- घाबरू नका, हा आजार बरा होतो

नाशिक3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कोरोना बरा होणारा आजार, 98 टक्के रुग्ण बरे होत आहेत घाबरू नका -पोलिस
  • युवकाला कोरोनाची लक्षणे दिसली, मात्र सलाईन इंजेक्शन घ्यायला घाबरत असल्याने घेतला निर्णय

मालेगावमध्ये दोन कोरोना सिद्ध झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोना झाल्याच्या भीतीने 31 वर्षीय तरुणाने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या वडिलांच्या दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रतीक राजू कुमावत (वय 31, रो. हाऊस नंबर 4 श्रीकृष्ण कॉलनी चेहडी शिव) असे आहे. या तरुणाने रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्याने त्याला कोरोनाची लक्षणे दिसतात व तो सलाईन इंजेक्शन घेण्याला घाबरत असल्याने आत्महत्या करीत आहे असा मजकूर लिहिलेला दिसून प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाने चेहेडी येथील डॉक्टरकडे रविवार व गुरुवारी उपचार घेतले आहेत. दरम्यान, संबंधित डॉक्टर म्हणाले की, दोन्ही वेळा मयताला कोरोनाची लक्षणे नव्हती, परंतु त्याला उगाच वाटत होते की, त्याला कोरोना झाला आहे.

दरम्यान, मयताच्या वडिलांच्या माहितीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरांनी मयताच्या घशातील स्राव काढून परीक्षणासाठी पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...