आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक कोरोना:नाशिकमध्ये 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू; कोरोग्रस्त असलेल्या सिन्नर येथून आल्याची माहिती

नाशिक2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सिन्नरमधूनच कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती, संपर्कातील व्यक्तींचा तपास

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात 3 दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. शहरातील बजरंग वाडी येथून आलेल्या या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले आहे. सदर महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले आहे. डिलिव्हरीसाठी ही महिला 28 एप्रिल रोजी सिन्नरवरून नाशिकला आली होती.

सिन्नरहून आल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना या महिलेचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. ही महिला 9 महिन्याची गर्भवती होती. तिच्या घशातील स्वॅबचे नमुणे घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचाच अहवाल मंगळवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

सिन्नरमध्येही कोरोनाचे रुग्ण असून ही महिला सुद्धा सिन्नरवरून नाशिकला आली होती.  त्यामुळे सिन्नर मधूनच ही गर्भवती महिला कोरोना बाधित असावी असा अंदाज लावला जात आहे. सिन्नरला सध्या 5 कोरोना बाधित रुग्ण आहेत. दरम्यान नाशिकला आल्यानंतर ही महिला कुठे-कुठे गेली होती याचा देखील शोध घेतला जा आहे. अशात या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी आता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...