आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट:ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, नाशिकमध्ये सुरू आहेत उपचार

नाशिक3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ठाणे येथे कार्यरत असताना पोलिस निरीक्षक आला कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात

ठाणे पोलिस आयुक्तालयात काम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याच्या स्वॅबचे सॅम्पल तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी जारी केलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस निरीक्षकावर सध्या नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मूळचा नाशिकचा असलेला हा पोलिस अधिकारी ठाणे पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर असलेला हा अधिकारी काही दिवसांपूर्वीच आपले मूळ शहर नाशिकला आला होता. याच ठिकाणी तो आजारी पडला. तपासासाठी स्वॅबचे नमुणे पाठवले ते पॉझिटिव्ह आले आहेत. या अधिकाऱ्याला नाशिकच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाणे येथे काम करत असताना पोलिस अधिकारी याच ठिकाणी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला असावा. त्यामुळेच त्याला कोरोनाची लागण झाली असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाइक किंवा मित्रांना इन्फेक्शन झाले किंवा नाही याचा सुद्धा पाठपुरावा घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...