आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसत नाही म्हणत केला होता पत्नीचा खून:पतीस सुनावला 25 हजारांचा दंड अन् जन्मठेपेची शिक्षा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली कॅम्प परिसरातील नानेगाव शिवारात राहणाऱ्या कामगाराने पत्नीशी वारंवार किरकाेळ कारणावरून वाद करून तू रंगाने काळी आहेस, सुंदर दिसत नाही म्हणत डाेक्यात लाेखंडी फावडा मारून खून केल्याची घटना घडली हाेती. याप्रकरणी न्यायालयाने संशयित पतीस जन्मठेपेची शिक्षा ठाेठावत 25 हजाराचा दंड सुनावला आहे.

संशयित आरोपीने आपल्या पत्नीची किरकोळ भांडणाच्या वादातून लोखंडी फावड्याने डोक्यात मारून तिची निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यातील संशयिताला न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

गुन्हयाचा तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस निरीक्षक आर. टी. मोरे यांनी करीत संशयित आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय येथे सुरू होती.

बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक सहाचे न्यायमूर्ती आर. आर. राठी यांनी गुन्हयातील संशयित आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी हिरामण बेंडकुळे याला सीआरपीसी कलम 235 (2) अन्वये भादंवि कलम 302 मध्ये जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून योगेश कापसे यांनी तर, पैरवी अधिकारी म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील सहायक पाेलिस उपनिरीक्षक जे. व्ही. गुळवे आणि हवलदार डी.बी. खैरनार यांनी काम बघितले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 25 जानेवारी संशयित आरोपी हिरामण निवृत्ती बेंडकुळे 30, रा. जय भवानी वस्ती, जयभवानी मंदिराजवळ, नाणेगाव ता.जि.नाशिक याने किरकोळ भांडणाच्या वादातून पत्नी काजल हिरामण बेंडकुळे (वय 26) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारहाण करत तिची निर्घृण हत्या केली होती. या हत्येबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...