आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिंडोरी रोडवरी ढकांबे मानोरी शिवारात शेतकरी वस्तीवर पडलेल्या दरोड्याची उकल करण्यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चार महिन्याच्या तपासानंतर पथकाने चार दरोडेखोरांना जेरबंद केले. टोळीकडून 16 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले. 12 नोव्हेंबर 2022 रोजी रतन बोडके यांच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्री 6 दरोडेखोरांना घरातील महिला व पुरुषांना बंदुक आणि चाकुचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि 8 लाख 50 हजारांची रोकड असे 17 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लुटून नेला होता.
याप्रकरणी अधिक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोलिस अधिक्षकांसह अधिकाऱ्यांना घटनास्थळी पहाणी करत तपास करण्यासाठी 3 वेगळे पथक तयार केले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुराव्याच्या अधारे संशयितांचा माग काढला. शहरात राहणारा संशयित नौशाद आलम फजल शेख रा. पंचशीलनगर याच्यावर पाळत ठेवत त्याला ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केली असता शहर व मध्यप्रदेशातील साथीदारांसह कार आणि दुचाकीने येऊन एका अलिशान बंगल्यात दरोडा टाकल्याची कबूली दिली. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून संशयितांचे नावे मिळाली या अधारे पथकाने संशियत रहेमान फजल शेख रा. राहुल नगर जेलरोड, इरशाद नईम शेख रा. जेलरोड, लखन बाबुलाल कुंडालीया, रवि उर्फ लालू देवीलाल फुलेरी, इकबाल खान फारुख खान सर्व रा. देवास मध्यप्रदेश आणि रवी उर्फ पवन रतन फुलेरी रा. इंदोर यांना अटक केली. वरिष्ठ निरिक्षक हेमंत पाटील, प्रमोद वाघ, अमोल पवार, नाना शिरोळे, रविंद्र वानखेडे, नवनाथ सानप, जालिंदर खराटे, विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, बाळासाहेब पानसरे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, किशोन सानप, मंगेश जोशी, प्रवीण बहीरम यांच्या पथकाने अपर अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
संशयित पुणे कारागृहात
दरोड्यातील संशयित दरोड्याच्या गुन्ह्यात पुणे मध्यवर्ती कारागृहात होते. पथकाने न्यायालयाच्या आदेशानुसार संशयितांचा ताबा घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.