आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या पेरूच्या बागेतील हुक्का पार्लरवर छापा:अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; इंदिरानगरमध्ये 20 हजाराचे साहित्य जप्त

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या अंमली पदार्थ विराेधी विशेष पथकाकडून इंदिरानगर भागातील पेरूच्या बागेत राजराेस चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी धूम्रपानास मनाई असणाऱ्या ठिकाणी अवैधरित्या हुक्का चालविणाऱ्या हाॅटेल मालकासह नऊ ग्राहकांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस पथकाने हाॅटेलमध्ये हुक्क्याचे वेगवेगळे फ्लेवर, अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाकडून अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पाथर्डी फाटा ते इंदिरानगर भागाला जाेडणाऱ्या भागात हॉटेल द पेरू फार्म येथे पथकाला मिळाेल्या माहितनुसार, याठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह युवक-युवती माेठ्या संख्येने धुम्रपान करण्याबराेबरच प्रतिबंधीत हुक्का पित असतात. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता हाॅटेलचे व्यवस्थापक संशयित नितीन शांताराम आहिरे, व हाॅटेल मालक संशयित शंकर राजाराम पांगरे रा. टाइम ब्लॉसम अपार्टमेंट,चौथा मजला, बडदेनगर यांना ताब्यात घेण्यात आले. विनापरवाना बेकायदा हुक्का बार चालवुन, प्रतिबंधीत हुक्का ग्राहकांना सेवनासाठी जागा उपलब्ध करून देवुन हुक्याची साधने व प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ पुरवली व हॉटेलमध्ये सात इसम हे प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करतांना मिळुन आले.

त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली सपोनि एच. के. नागरे,पोहवालदार भामरे, शस्त्र विरोधी पथकाचे सपोउनि गांगुर्डे पोहवा सूर्यवंशी, पोना सवळी, पोशि जोशी, ह यांनी कामगिरी केली. या कारवाईने धाबे दणाणले असून पोलिसांच्या कारवाईने समाधान व्यातबकेले जात आहे.. या

बातम्या आणखी आहेत...