आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहर व परिसरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरुच असून रविवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक खूनाची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड व सरकारवाडा पाेलिस संयुक्त तपास करीत आहे. सिडकाेतील हेडगेवार नगर भागातील रहिवासी असलेल्या कैलास साबळे याचा मृत्यू झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, हा खून की सदाेष मनुष्यवधाचा प्रकार यावरून पाेलिस यंत्रणेत संभ्रम असून मृताच्या कुटुंबीयांनी मात्र हा खूनच असल्याचा आराेप केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिबेटीयन मार्केट येथे चायनीजचा गाडा चालविणाऱ्या कैलास साबळे ( रा. हेडगेवार चाैक, सिडकाे) हा गाडा बंद करून शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घरी आला हाेता. थाेड्यावेळाने त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर बाेलावून साेबत घेवून गेले. रात्री उशिरा म्हणेजच साधारणत: मध्यरात्री दाेन ते तीन वाजेच्या सुमारास साबळे हा घराच्या समाेरच जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासताच त्यास मयत घाेषित केले.
दरम्यान, साबळे याच्या पत्नीसह कुटुंबीयांकडून त्याच्या मित्रांनीच त्याचा घात केल्याचा आराेप केला आहे. तर स्थानिक नागरिकांनी सांगितले की त्यास बाहेरच मारहाण करून जखमी अवस्थेत मद्याच्या नशेतच त्याला घराबाहेर टाकून गेल्याची चर्चा आहे. कैलास साबळे यांच्या डाेक्यावर व अंगावर जखमा असून त्याच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचेही दिसून येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकाराने सिडकाेसह परिसरात खळबळ उडाली असून पाेलिस यंत्रणेच्या निष्क्रीयतेविषयी संताप व्यकत केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.