आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री दादा भुसे यांना घेराव:नुकसान पाहणीवेळी वातावरण तापले: जवान गणेश गीते बेपत्ता प्रकरणी सिन्नरचे ग्रामस्थ आक्रमक

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चांदोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी भुसे यांनी केली.

मात्र, यावेळी जवान गणेश गीते बेपत्ता प्रकरणी गावकऱ्यांनी दादा भुसे यांना घेराव घातला. त्यामुळे काही वेळ वातावरण तापले होते.

खचून जाऊ नका...

दादा भुसे यांच्या या दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांना योग्य त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांनी खचून न जाता योग्य पद्धतीने नियोजन करावे व पिक विमा काढण्याबाबत त्यांनी आवाहन केले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.

गावकरी आक्रमक...

पंतप्रधानाच्या सुरक्षा ताफ्यातील जवान गणेश गीते यांच्या बेपत्ता प्रकरणी दादा भुसे यांना ग्रामस्थांनी घेराव घातला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चोंढी या आपल्या गावी सुट्टीनिमित्ताने आले असता कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. 21 तास होऊनही यंत्रणेला मृतदेह सापडत नसल्याने ग्रामस्थांनी दादा भुसे यांना घेराव घातला होता. त्यामुळे मृतदेह सापडत नाही तोपर्यंत जाणार नाही असे सांगण्याची वेळ आली होती.आज सकाळी पालकमंत्री दादा भुसे सिन्नरला भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...