आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिरांना कायदेशीर मार्गदर्शन:नाशिकमध्ये मूकबधिर असोसिएशन, रोटरी गोदावरी यांचा उपक्रम

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील मूकबधिरांसाठी त्यांच्या सांकेतिक भाषेत कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर ते पुणे मुंबई तसेच कोकण भागातील सुद्धा १०० पेक्षा जास्त मूकबधिर लोकांनी यात सहभाग नोंदवला.

मूकबधिरांना असलेल्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी तसेच भारतीय दंड संहितेनुसार त्यांना असलेले अधिकार व संरक्षण याबाबत जागरुकता वाढवून, त्यांची फसवणूक होऊ नये हा सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात​​​​ मुंबईच्या दुभाषी तज्ज्ञ तनवी जोशी यांनी मार्गदर्शन केले.

मूकबधिर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक ३०३० चे प्रांतपाल डॉक्टर आनंद झुंझुनवाला व हिंदू समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मदन जगोटाजी उपस्थित होते.

जन्मतः मूकबधिर असलेल्या लोकांसाठी आजही शैक्षणिक प्रणाली खूप प्रगत झालेली नाही त्यामुळे ती एक तर अशिक्षित असतात किंवा त्यांचे शिक्षण अर्धवट झालेले असते. त्यामुळे त्यांची शेतजमीन जंगम मालमत्ता किंवा इतर अनेक आर्थिक व्यवहारात फसवणूक होत असते. हे टाळता यावे याकरीता हे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

नाशिकच्या महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व मूकबधिर व्यक्तींना समजेल अशा सांकेतिक भाषेत मार्गदर्शन केले. कायदेशीर मार्गदर्शन शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचे अध्यक्ष ओंकार महाले, सचिव मीनल पलोड, सुरेश चावला, तहसील, महसूल अधिकारी अनिल रोकडे, जयसिंग काळे, पंकज सोनवणे मूकबधिर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गायकवाड सचिव कशिष छाब्रा उपाध्यक्ष गोपाळ बिरारी त्याचबरोबर आर्किटेक चारुदत्त नेरकर, राजेश सिंगल, पुरुषोत्तम पटेल, किरण सागोरे, रोहित सागोरे, डॉ.वैभव वाणी यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...