आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली-नाशिक-दिल्ली अशी नियमित सेवा स्पाइस जेट कंपनीकडून दिली जात असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या विमानसेवेला उशीर हाेत आहे. गुरूवारी तब्बल दिड तास फ्लाइट उशीराने नाशिक विमानतळावर पाेहाेचले आणि नियाेजित वेळेपेक्षा दिड तास उशीराने दिल्ली विमानतळावर लॅण्ड झाले. सातत्याने विमानसेवेला उशीर हाेत असल्याने मात्र प्रवाश्यांची नियाेजित कामे पुर्ण करणे आव्हानात्मक बनत चालले आहे. याचा परीणाम प्रवासी क्षमतेवरही हाेण्याची दाट शक्यता व्यक्त हाेत आहे.
नाशिकहून दिल्ली साठी गुरुवारी (दि. 5) सकाळी 11.20 वाजता नियाेजित वेळ असलेले स्पाइस जेटच्या विमानाने दुपारी 12.45 वाजता टेकऑफ केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या विमानसेवेला उशीर हाेत असल्याने प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, याचमुळे प्रवाशी या सेवेकडे पाठ फिरवत तर नाही ना? अशी भिती व्यक्त हाेत आहे. कारण, नियमित पुर्णपणे भरणाऱ्या विमानात गुरूवारी निम्मेच म्हणजे, 90 प्रवासी दिल्लीकडे रवाना झालेले पहायला मिळाले.
लाेकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
नाशिकहून दिल्ली, बँगलोर, गोवा, हैद्राबाद,चेन्नई अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. मात्र प्रवाशी मिळत नसल्याचे कारण सांगत विमान कंपन्यांनी नाशिकहून अचानक विमानसेवा बंद करण्याची बाबही समाेर आली आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असतांनाच आता स्पाइस जेटच्या विमानालाही उशीर हाेत असल्याने प्रवासी संख्या कमी हाेऊ नये, याकरीता खासदार हेमंत गोडसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विमानकंपनीचे लक्ष वेधले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
नियोजित कामे वेळेत होत नाही
आपापली नियोजित कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी लोक विमानाने प्रवास करतात. मात्र दोन दोन तास विमान उशिराने उडान घेत असल्याने कामे पूर्ण होत नाही. त्यामुळे हकनाक मनस्ताप सहन करावा लागतो. - सलीम शेख, प्रवासी, तथा माजी नगरसेवक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.