आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक दुर्घटना:'घटना अत्यंत दुर्दैवी, यानंतर दुसऱ्या ठिकाणी असे घडणार नाही याची प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता' - देवेंद्र फडणवीस

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला.

नाशिक येथील महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर आहेत. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस या दुर्घटनेविषयी बोलताना म्हणाले की, 'नाशिक येथील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारे ऑक्सिजनच्या व्यवस्थेमध्ये लिकेज होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणे हे खरोखर धक्कादायक आहे. हे कसे काय झाले याचे सत्य लवकरच समोर येईल. मात्र आता इतर रुग्णांना तात्काळ मदत केली पाहिजे. ज्या पेशंटला शिफ्ट करायची आवश्यकता आहे अशांना केले पाहिजे. याची सखोल चौकशी तर होत राहिल मात्र हे सुरू असतानाच यापुढे इतर ठिकाणी असे काही होणार नाही यासाठी काळजी प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे. घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.'

नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यामुळे सर्वत्र हाहाकर माजला. दवाखान्यात विदारक दृष्य पाहायला मिळत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. याच अर्ध्या तासामध्ये तब्बल 22 जणांचा जीव एका झटक्यामध्ये जीव गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...