आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या बड्या थकबाकीदारांमध्ये आजी-माजी आमदार, माजी जिल्हा परिषद व पंचायत समीती सदस्य यांच्यासह बॅंकेचे माजी चेअरमन, संचालकांचे भाऊ, पत्नी, वहीणी आणि मुले यांचा माेठ्या प्रमाणावर समावेश आहे. तसेच 23 काेटी 83 लाख 88 हजार 501 काेटी रूपयांची थकबाकी त्यांच्याकडेच आहे.
विशेष म्हणजे, काही हजार आणि लाख रूपयांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची वाहने जप्त करून लिलाव केले गेले मात्र या बड्यांवर कारवाइ कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच बराेबर बॅंकेचे संचालकपद कशासाठी हवे? हे देखिल या यादीवर नजर टाकल्यावर बॅंकेचे सभासद, ठेवीदार यांच्या लक्षात येत आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत संतप्त सभासदांनी बॅंकेचे कर्ज थकविणाऱ्या संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावांची यादी रक्कमांसह जाहीर करण्याची मागणी करण्यात आली हाेती. यानंतर बॅंकेच्या प्रशासकांनी आता बॅंकेचे माजी चेअरमन, माजी संचालक यांच्या नातेवाइकांच्या नाव व संबंध यांसह थकबाकीची यादी मुख्यालयात दर्शनी भागावर प्रसिध्द केली आहे. यात केवळ बॅंकेचेच नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकाऱ्यांचा तसेच एका राजकिय पक्षाच्या तालुकाध्यक्षाच्या नावाचाही समावेश असल्याने सभासद, ठेवीदार संतप्त झाले असून यांच्याकडून वसुलीसाठी तातडीने कठाेर पावले उचलून सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहीनी असलेली ही बॅंक वाचविण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. ही यसुली तातडीने न झाल्यास बॅंकेवर माेर्चा आणण्याची तयारी देखिल सुरू झाल्याचे समजते.
माजी चेअरमन गणपत पाटील स्वत:सह बंधु अशाेकराव पाटील, दिनकरकराव पाटील, वहीणी कल्पना पाटील, पुष्पावती पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विद्याताइ पाटील, त्यांचे पती दत्तात्रय पाटील, मुलगा शिवराज पाटील, अमाेल पाटील, दिर प्रल्हाद पाटील, माजी आमदार धनराज महाले, पत्नी जयश्री महाले, मुलगा वैभव महाले, माजी आमदार रामदास चाराेस्कर यांच्या पत्नी सुनीता चाराेस्कर,माजी आमदार शिवराम झाेले, बॅंकेचे माजी चेअरमन परवेज काेकणी यांचे बंधु रमजान काेकणी, मृत संचालक नरेंद्र अहिरे, भाजपा ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांच्याकडे 1988 पासून थकित, माजी चेअरमन व आमदार अॅड. माणिकराव काेकाटे यांचे बंधु विजय शिवाजीराव काेकाटे, माजी चेअरमन देविदास पिंगळे यांचे बंधु राजेंद्र पिंगळे, शिवाजी पिंगळे, बाळासाहेब पिंगळे आणि गाेकुळ पिंगळे, माजी मंत्री व बॅंक संचालक डाॅ.शाेभा बच्छाव यांचे बंधु व माजी पंचायत समिती सदस्य दिलीप लक्ष्मणराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य धनश्याम इनामदार, माजी भाजपा तालुकाध्यक्ष (देवळा) सुनील देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सिंधुबाइ साेनवणे, मविप्रचे माजी उपाध्यक्ष दिलीप दळवी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.