आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वज विजयाचा:नाशिक जिल्ह्याची दहावीत धडाकेबाज कामगिरी, निकाल 96.37 टक्क्यांवर; 40 हजार विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 96.37 टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातवारण

नाशिक जिल्ह्यातील 40 हजार विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले आहे. तर 33 हजार विद्यार्थी प्रथम श्रेणी व 13 हजार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश पटकावले आहे. सिन्नर तालुक्याचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के लागला आहे. तर देवळा, इगतपुरी, नांदगाव, येवला, त्र्यंबक या तालुक्यांचा निकाल 97 टक्क्यांहून अधिक लागला आहे.

ग्रामीणचा निकाल 96.35 टक्के

नाशिक ग्रामीण विभागाचा निकाल 96.35 टक्के तर महापालिका परिसरातील निकाल 96.51 टक्के लागला आहे. नाशिक जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 95.42 टक्के मुलींच्या उत्तीर्ण टक्केवारी 97.47 टक्के आहेत. राज्यात एकूण 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

9 जुलैपर्यंत अर्जाची संधी

ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषया व्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी 20 ते 29 जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी 20 जून ते 9 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

पुरवणी परीक्षा जुलैमध्ये

दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहे. मंडळाकडून लवकरच स्वतंत्रपणे निर्गमीत केले जाणार आहे.

तालुक्याचा असा आहे निकाल

चांदवड- 95.76 टक्के, दिंडोरी- 96.25 टक्के, देवळा- 97.47 टक्के, इगतपुरी- 97.23 टक्के, कळवण- 96.39 टक्के, मालेगाव- 95.12 टक्के, नाशिक- 96.35 टक्के, निफाड- 95.51 टक्के, नांदगाव- 97.16 टक्के, पेठ- 95.66 टक्के, सुरगाणा- 95.50 टक्के, सटाणा- 96.45 टक्के, सिन्नर- 97.51 टक्के, त्र्यंबक- 97.17 टक्के, येवला- 97 टक्के, मालेगाव मनपा- 94.47 टक्के, नाशिक मनपा- 96.61 टक्के.

बातम्या आणखी आहेत...