आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव:'एनडीसीए'च्या लोगोचे लीना बनसोड यांच्या हस्ते अनावरण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला यंदा 50 वर्षे पूर्ण झाले आहे. यानिमित्त असाेसिएशनच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने एनडीसीएच्या सुवर्ण महोत्सव लोगोचे अनावरण महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाच्या डायरेक्टर लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.

या साेहळ्यास विलास लोणारी , नाना सूर्यवंशी , प्रशांत भालेकर व कुटुंबीय तसेच स्टार ईलेवनचे चंद्रशेखर- बंडू - दंदणे, तरुण गुप्ता, नॅशनल एग्रोचे मुजावर नबील यांच्यासह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा , सचिव समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे , रमेश वैद्य ,राजाभाऊ भागवत तसेच इतर अनेक आजी व माजी पदाधिकारी , एन डी सी ए स्मरणिका संपादक दीपक ओढेकर आदी उपस्थित होते.

याबरोबरच किशोर सूर्यवंशी आंतर तालुका व सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ देखील पार पडला. यांस दोन्ही स्पर्धेतील उपविजेते व विजेते संघ , त्यांच्या प्रशिक्षकांसह उपस्थित होते. एनडीसीएचे सदस्य ,खेळाडू , एनडीसीए निवड समिती सदस्य सतिश गायकवाड, फैय्याज गंजीफ्रॉकवाला यांसह तालुका संघ निवडणारे सर्व निवड समिति सदस्य , अनेक खेळाडूंचे पालक तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. एनडीसीएच्या इतिहासा बरोबरच वरील दोनही स्पर्धा कशा प्रकारे सुरू झाल्या हे सांगतानाच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या भावी योजनांचे सुतोवाच व खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यात आले. एनडीसीएचे सचिव समीर रकटे यांनी सूत्रसंचालन केले

दरम्यान या आधी सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रभाकर दाते ईलेव्हन संघाने शेखर गवळी ईलेव्हन वर 9 गडी राखून मात करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यातील सलामीवीर मनमोहन डंकच्या 48 चेंडूतील 107 धावांच्या झंझावती खेळीने दाते ईलेव्हनला 16 व्या षटकातच मोठा विजय मिळवता आला. शेखर गवळी ईलेवनने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 148 धावा केल्या होत्या. मनमोहन डंकने सामनावीर या बरोबरच स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षकाचाही मान मिळवला. तर विजेत्या संघाचा कर्णधार सिद्धार्थ नक्काने मालिकावीराचा किताब पटकावला. रामचंद्र पार्टे विजेत्या संघाचे प्रशिक्षक होते.

बातम्या आणखी आहेत...