आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये महाराष्ट्र स्पोर्टस् कौन्सिल ऑफ द डिफ यांच्यावतीने कर्णबधीर खेळाडुंसाठी जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत गोळाफेक प्रकारामध्ये स्वयम् संतोष मैड याने 18 वर्षाखालील गटामध्ये कास्य पदक पटकावले आहे.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून तीनशेच्या वर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या संस्थेच्या नाशिक शाखेच्यावतीने विभागीय क्रीडा संकुल, आडगांव नाका, पंचवटी, नाशिक येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.
जलतरण, उंच उडी, लांब उडी, धावणे, गोळा फेक, भाला फेक, कुस्ती इत्यादी विविध क्रीडा प्रकार या स्पर्धेत घेण्यात आले. त्यापैकी गोळा फेक या प्रकारात स्वयम् मैड याने कास्य पदक पटकावले. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या स्पर्धेत स्वयम् पहिल्यांदाच सहभागी झाला आणि पदापर्णातच त्याने हे यश मिळवले . त्याच्या या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
स्वयम् हा नाशिक येथील रचना विद्यालयाचा विद्यार्थी असून तो इयत्ता नववीमध्ये शिकत आहे . स्वयम्ने दिव्यंगत्त्वावर मात करत हे यश मिळवले असून त्यासाठी तो रोज सकाळी शिखरेवाडी मैदान, नाशिक येथे प्रशिक्षक ऋषभ पाटील सर यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे .
स्वयम्च्या या यशामध्ये त्याचे वडिल संतोष आणि आई भारती मैड यांचा मोलाचा वाटा आहे . या यशाबद्दल रचना विद्यालयाच्या प्राचार्या संगिता टाकळकर , वर्ग शिक्षिका नीताताई घरत, मीनाक्षीताई बागल , क्रीडा शिक्षक कीर्ती गायकवाड, यशवंत ठोके , कीर्ती पाटील आदिंनी स्वयम याचे अभिनंदन केले आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.