आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा:यश भंडारी, अनन्या फडके व अर्चित रहाणे यांना दुहेरी मुकूट

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत यश भंडारी याने 11 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत राघव महाले याचा 3-0 तर 13 वर्षाखालील मुलांच्या गटात यशने राघव महालेचाच 3-0 असा सहज पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.

15 वर्षाखालील मुलींच्या गटात अनन्या फडके हीने अंतिम फेरीत स्वरा करमरकरचा 3-1 असा पराभव केला तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात अनन्याने मिताली पुरकरचा 3-2 असा पराभव करून दुहेरी मुकूट मिळविला. 15 व 17 वर्षाखालील गटात अर्चित रहाणे याने दुहेरी मुकूट मिळविताना अनुक्रमे 15 वर्षाखालील मुलांच्या गटात अजनिश भरडे याचा 3-0 तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्चितने अन्वय पवारचा 3-1 असा पराभव करून दोन्ही गटातील विजेतेपद आपल्या नावावर जमा केले. 11 वर्षाखालील मुलींच्या गटात केशिका पुरकरचा अटीतटी लढतीत 3-2 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा करमरकरने अपेक्षेप्रमाणे इरा गोगटे चा 3-0 असा पराभव करून विजेतेपद् मिळविले. पुरुष एकेरीत नुतांशु दायमा याने अंतिम फेरीत अजिंक्य शिंत्रे याचा 4-0 असा पराभव करून विजेतेपद् मिळविले.

40 वर्षावरील वेटरन्स गटात अंतिम फेरीत अमोल सरोदे याने अंतिम फेरीत विनोद ठाकूर यांचेवर 3-0 अशी मात करून विजय मिळविला. 50 वर्षावरील वेटरन्स गटात ऑगस्टिन डिमेलो यांनी अंतिम फेरीत संदीप भागवत यांचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद् मिळविले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष शिव छत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते पार पडला. सूत्रसंचालन सचिव शेखर भंडारी यांनी केले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

11 वर्षाखालील मुले

यश भंडारी वि.वि. राघव महाले 11-7, 11-8, 11-9

11 वर्षाखालील मूली

केशिका पूरकर वि. वि. ओवी रहाणे 11-7, 11-8, 5-11, 7-11, 11-5

13 वर्षाखालील मुले

यश भंडारी वि. वि. राघव महाले 11-5, 11-7, 11-8

13 वर्षाखालील मूली

स्वरा करमरकर वि.वि. इरा गोगटे 11-4, 11-6, 11-5

15 वर्षाखालील मुले

अर्चित रहाणे वि.वि अजनिश भरडे 11-1, 11-5, 11-7

15 वर्षाखालील मूली

अनन्या फडके वि.वि. स्वरा करमरकर 11-7, 11-7, 9-11, 11-9

17 वर्षाखालील मुले

अर्चित रहाणे वि.वि. अन्वय पवार 11-7, 11-8, 8-11, 11-7

17 वर्षाखालील मूली

अनन्या फडके वि.वि. मिताली पूरकर 11-8, 9-11, 8-11, 11-7, 11-8

पुरुष एकेरी

40+ प्रौढ गट

अमोल सरोदे वि.वि. विनोद ठाकूर 11-7, 11-9, 11-7

50+ प्रौढ गट

ऑगस्टिन डिमेलो वि.वि. संदीप भागवत 11-8, 11-7, 11-6

बातम्या आणखी आहेत...