आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशालेय शिक्षणात संगणकीय विचार आणि समस्या निराकरणासाठी आणि भविष्यातील कौशलयांवर भर देण्यासाठी नाशिकसह 8 जिल्ह्यांची प्रयोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरावर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, ॲमेझॉन सीएसआर आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने ही निवड करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील 8 जिल्ह्यांमधील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये 'प्रोमोटिंग कॉम्प्युटर सायन्स एज्युकेशन ॲण्ड 21 सेंच्युरी स्किल' (ॲमेझॉन- एलएफई) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
'या' जिल्ह्यांची निवड
यंदा राज्यातील नाशिकसह पुणे, नागपूर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नगर आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील शिक्षकांना ऑनलाइन कोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच्या पुढील टप्प्यात मुलांसाठी कॉम्प्युटर लॅब, लॅपटॉप, टॅब अशा भौतिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
शिक्षकांचे मूल्यांकन होणार
दरम्यान, या संस्थेमार्फत घेतल्या जात असलेल्या उपक्रमात शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन होऊन त्यानुसार गुणवत्ताक्रम ठरवला जाईल. या कार्यक्रमातंर्गत संगणकीय विचार आणि कोडिंगचा परिचय (आयसीटीसी) या कोर्सचा समावेश आहे. एएफई सीएस टीचिंग एक्सेलन्सअंतर्गत आयसीटीसी हा कोर्स शिक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे.
शिक्षकांनाही सहभागी होता येणार
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळेतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांना यात सहभागी होता येईल. सर्वोत्तम सहभाग व कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना विशिष्ट पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यातील टॉपर शिक्षकांना संगणक लॅब पुरविण्यात येणार आहे. या लॅबच्या माध्यमातून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. याअंतर्गत लाखो विद्यार्थी व पाच हजार शिक्षकांना संगणकीय ज्ञान व कॉम्प्युटर सायन्समधील विविध संकल्पना शिकण्याची संधी मिळणार आहे.
गुणवत्ता वाढीला चालना
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला या उपक्रमाद्वारे चालना मिळू शकेल. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना या कार्यक्रमातंर्गत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक अधिकारी भगवान फुलारी यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.