आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा14 वर्षांखालील मुलींच्या नाशिक विभागीय खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेने नंदुरबार जिल्ह्याचा एक डाव आणि गुणांनी पराभव करुन आपल्या विजयाची परंपरा कायम राखली.
नाशिक मनपाच्या स्पर्धेपासून ते विभागीय खो खो स्पर्धेच्या अंतिम फेरी पर्यन्त सर्व सामने डावाच्या फरकाने जिंकुन या विभागातले आपले एकतर्फी वर्चस्व सिध्द केले.
या आधी सुद्धा अशाच फरकाने शासकीय कन्या शाळेचा संघ विजयी होत होता. सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत हा संघ नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नाशिकच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात जळगाव जिल्ह्याचा एकतर्फी पराभव करुन आपल्या विजयी मोहिमेचा शुभारंभ केला. आपल्या पहिल्या आक्रमणात नाशिकने प्रतिस्पर्धी जळगाव जिल्ह्याचे पंधरा गडी बाद केले. तर प्रतिस्पर्धी संघ दोन्ही डावात मिळून नशिकचे अवघे आठ गडी बाद करू शकले. नाशिकने हा सामना एक डाव आणि सात गुणांनी जिंकला.
तर नाशिकने दुसऱ्या सामन्यात जळगाव मनपा चा एक डाव आणि वीस गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. नाशिकने केलेल्या एकमेव आक्रमणात वीस गडी बाद केले. जळगाव संघ एक गडी सुध्दा बाद करू न शकल्याने त्याने सामना सोडुन दिला.
अंतिम सामन्यात नाशिकने आपल्या पहिल्या धारधार आक्रमणात नंदूरबारचे अठरा गडी बाद केले. तर नंदूरबारने पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. नाशिक कडून खेळताना राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती खेळाडू कर्णधार रोहिणी भवर चार गडी, कौसल्या कहांडोळे तीन मिनिट आणि पंचवीस सेकंद आणि चार गडी, कावेरी खोटरे, मानसी वेल्दे, रसिका भोये यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तर चंदना कनोजे हिने दोन मिनिट आणि पंचेचाळीस सेकंदाचे संरक्षण करतांना दोन गडी बाद केले. तिला वर्षा सोनवणे दोन मिनिट आणि वीस सेकंद व एक गडी, प्राजक्ता बोरसे एक मिनिट आणि तिस सेकंद यांनी नाशिकच्या एकतर्फी विजयात मोलाचा वाटा उचलला. नाशिकने हा सामना एक डाव आणि 11 गुणांनी जिंकून सलग तिसऱ्यांदा राज्य स्तरीय स्पर्धे करता आपले तिकीट पक्के केले.
तर मुलांच्या गटात नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व जिल्हा परिषद शाळा तोरंगण ह्या शाळेने केले. प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ह्या संघाने सर्व सामने हे डावाच्या फरकाने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी जळगाव जिल्ह्याचा डावाच्या फरकाने आणि नंदूरबार संघाचा एक डाव आणि पंधरा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.