आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विभागीय खो-खो स्पर्धा:श्रीराम विद्यालयाला दुहेरी विजेतेपद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे 19 वर्षे आतील नाशिक विभागीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन नाशिकचा विद्यापीठ खो खो खेळाडू व प्रशिक्षक दिपक लभडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा अधिकारी महेश पाटील, जिल्हा खो खो असोसिएशनचे उमेश आटवणे, गणेश धेमसे, योगेश शेरताटे, सागर कटारे व नाशिक भागातून आलेले विविध संघांची प्रशिक्षक उपस्थित होते.

19 वर्षा आतील मुला मुलींच्या खो-खो स्पर्धा आज संपूर्ण दिवसात पार पडल्या. मुलींच्या गटात श्रीराम विद्यालय पंचवटी या नाशिक मनपाच्या संघाने मालेगांव 1 डाव 15 गुण, जळगाव 1 डाव 10 गुण विजय संपादन करत अंतीम फेरी गाठली. तर नाशिक ग्रामीणच्या अलगुन आश्रमशाळेच्या मुलींनी धुळे 1 डाव 10 गुण मिळाले.

नंदूरबार 1 डाव 12 गुण विजय मिळवत अंतीम फेरी गाठली. अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालय पंचवटी हा संघ नाशिक मनपाचे तर अनुदानित आश्रम शाळा अलंगुन हा संघ नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत होता. नाणेफेक जिंकून अलंगून संघाने संरक्षण स्वीकारले श्रीराम विद्यालयाच्या आक्रमणापुढे त्यांचे संरक्षण कोलमडले या श्रीराम विद्यालय बारा गुण मिळविण्यात यश मिळाले श्रीराम विद्यालयाने संरक्षण करताना केवळ प्रतिस्पर्धी संघास एक गुण बहाल केला जयश्री महाले 3 मिनिट संरक्षण केले तर निशा वैजल 6 मिनिट नाबाद संरक्षण केले. मध्यंतराला बारा विरुद्ध एक अशी 11 गुणांची भक्कम आघाडी श्रीराम विद्यालय कडे होते दुसऱ्या संरक्षणात देखील जना घुटे 3.30 मि.विद्या मिरके 3.20 मि. मनीषा पडेर 2.10 मि.नाबाद यांनी उत्तम संरक्षण केले . मनीषा पडेर व निशा वैजल यांच्या अष्टपैलू कामगिरीला विद्या मीरके, शिवानी लहारे, सुनीता बेंडकोळी यांच्या आक्रमणाची उत्तम साथ लाभली . श्रीराम विद्यालय संघाने एका डाव 9 गुणांनी विजय संपादन केला.

मुलांच्या गटाचा अंतिम सामना नाशिक जिल्हा व धुळे जिल्हा यांच्या दरम्यान झाला प्राथमिक सामनात नाशिक संघाने जळगाव मनपा व नंदुरबार या संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली तर धुळे संघाने पहिल्या सामन्यात जळगाव जिल्हा व दुसऱ्या सामन्यात नाशिक मनापासून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून धुळ्याने प्रथम संरक्षण स्वीकारले नाशिकच्या धारदार आक्रमणाने धुळ्या संघाचे 12 गुण प्राप्त केले तर भक्कम संरक्षण करत डोळ्याला फक्त पाच गुण दिले मध्यंतराला नाशिक संघाकडे सात गुणांची भक्कम विजयी आघाडी घेत सामना 12/10 असा एक डाव दोन गुणांनी सहज विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...