आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यांचा आणि राज्याचा महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाला नुकतेच अप्पर आयुक्त आणि महसूल उपायुक्त हे मिळाले आहे. मात्र गत पुरवठा उपायुक्त मिळत नसल्याने हे पद रिक्त असून इतर उपयोग त्यांना याचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.
नाशिक महसूल विभागीय आयुक्त अप्पर आयुक्त महसूल उपयुक्त पुरवठा उपायुक्त ही पदे रिक्त होती. त्यामुळे इतर उपायुक्तांना या विभागांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने दोन पदांची कामे करताना तारेवरची कसरत होत असल्याचे दिसून येत होते. नुकतच अप्पर आयुक्त म्हणून निलेश सागर आणि महसूल उपायुक्त म्हणून संजय काटकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यामुळे पेंटिंग असलेल्या फायली निकाली राखण्यास लागण्यास मदत होणार आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेल्या धान्य वितरण विभागाच्या उपायुक्त अद्यापही आयुक्तालयाला मिळाला असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार ह्या पाचही जिल्ह्यांमध्ये नागरिक शिधापत्रिकांपासून वंचित आहे. त्यांनी अर्ज केलेले असूनही सर्वर डाऊन असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजना घेण्यासाठी अडचण येत आहे तर योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर पुरवठा उपयुक्त नेमावे अशी महसूल कार्यालयातही चर्चा आहे.
सध्या पुरवठा विभागाचा अतिरिक्त भार हा रोजगार हमी योजनेच्या उपायुक्त प्रज्ञा बडे मिसाळ यांच्याकडे आहे. पुरवठा विभागासारख्या ठिकाणी नियमित उपयोगाची आवश्यकता असून ही राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे कार्यालय थेट नागरिकांशी जोडलेले नसलेही तरी जिल्ह्यातील कार्यालयांवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण समजले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.