आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धा:एचपीटी- आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ पात्र, 19 खेळाडूंचा सहभाग

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा अंतर्गत जिल्हा स्तरीय शालेय 19 वर्षाआतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा नुकत्याच भोसला मिलिटरी स्कूल येथे घेण्यात आली. स्पर्धेत मनपा क्षेत्रातील 19 संघानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धा ह्या बाद पध्दतीने खेळविण्यात आल्या.

स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी - आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या फुटबॉल संघाने सहभाग घेऊन प्रथम सामन्यात होरायझन स्कूलचा 4-0 गोल ने आणि नंतर डॉन बॉस्को स्कूलचा 3-0 गोल ने तर सेमी फायनल मध्ये के. टी. एच. एम. कॉलेजचा 3-0 गोल ने पराभव केला. अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत भोसला मिलिटरी स्कूलचा पेनल्टी शुट आऊट वर पराभव केला.

एचपीटी - आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाची निवड ही विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी झाली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. एम. डी. देशपांडे मॅडम यांच्या हस्ते विजेत्या संघाचे व खेळाडूंचे गुलाब पुष्प देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित डॉ. प्रणव रत्नपारखी सर, प्रा. स्नेहल मुळे मॅडम, प्रा. मैत्रेयी काळे मॅडम क्रीडा विभागाचे प्रा. सुरेश कोकाटे, प्रा. तेजस कुलकर्णी आणि जिमखाना सहाय्यक सुरेश शर्मा हे उपस्थित होते.

कृष्णा शिंपी, लोकेश आवारी, रुद्र सांगळे, तन्मय चव्हाण, तुषार खरात, ईशान पांडे, खेमराज राजपूत (संघनायक), कबीर बागडे, उन्मेश भामरे (उप संघनायक),आयुष भालेराव, आर्यन कोपे, सिद्धार्थ शार्दुल, ओम हिवाळे, प्रणित पेंढारी, तेजस बंदावणे, श्लोक वाघमारे

वरील विजेत्या संघाला गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. एम. एस. गोसावी साहेब, संस्थेच्या एच. आर. संचालक डॉ. दिप्ती देशपांडे मॅडम, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी , संस्थेच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शैलेश गोसावी यांचे आशीर्वाद लाभले आहे. कॉलेजच्या सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका आणि कर्मचारी वर्ग यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...