आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडीलांचे बाहेर अनैतिक संबध असल्याच्या कारणातून वडिलांचा आणि वडिलांना साथ देत असल्याच्या संशयातून आजोबाचा खुन करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना जन्मठेपची शिक्षा ठोठवण्यात आली. दुहेरी खुन खटल्याचा निकाल शुक्रवार (दि. 6) रोजी लागला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जगमलानी यांनी ही शिक्षा ठोठवली.
राहुल ज्ञानेश्वर फोकणे (वय 25), प्रमोद ज्ञानेश्वर फोकणे (वय 23) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. नितीन फोकणे याची निर्दोष मुक्तता केली.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर 2019 रोजी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजी घोटी खुर्द (ता. इगतपुरी) येथे गट नंबर 177 मधील शेतात हा प्रकार घडला होता. मृत ज्ञानेश्वर काशिनाथ फोकणे (वय 48) आणि त्यांचे वडील काशिनाथ वामन फोकणे (वय 65) यांच्या मालकीचे शेती, घर आणि हाॅटेल आहे.
वडील ज्ञानेश्वर फोकणे यांचे बाहेर अनैतिक संबध असल्याने त्यांना मद्याचे व्यसन जडले होते. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. जागा, हाॅटेल, विकणार असल्याचा संशय मुले राहुल, प्रमोद आणि नितिन यांना आला होता. मुले वडीलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आजोबांना ते वडिलांच्या अनैतिक संबधाबाबत सांगत होते. मात्र, आजोबा काशिनाथ फोकणे देखील वडीलांना साथ देत असल्याने आजोबा आणि वडील आरोपींची आई मिराबाई यांच्या सोबत भांडण करत वाद घालत होते. यामुळे घरात नेहमी भांडण होत असल्याने वडील आणि आजोबाचा काटा काढण्याचा कट रचला.
आजोबा आणि वडील घरात असतांना आरोपी प्रमोद आणि राहुल यांनी घरातील धारधार वस्तूने वडील ज्ञानेश्वर आणि आजोबा काशिनाथ यांच्या डोक्यात गंभीर वार करुन खुन केला. गुन्ह्यात वापरलेली हत्यार दारणा नदीत धवून फेकून दिले. लहान भाऊ आरोपी नितीन याने दोघा भावांचे रक्ताने माखलेले कपडे जंगलात नेऊन लपवून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन वरिष्ठ निरिक्षक विश्वजीत जाधव यांना गुन्ह्याचा तपास करत आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पंच,साक्षीदार, फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरुन आरोपी राहुल आणि प्रमोद या दोघा भावांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवली. सरकारपक्षाने 10 साक्षीदार तपासले, अॅड. शिरिष कडवे, अॅड. योगेश कापसे, अॅड. दिपशिखा भिडे यांना सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.