आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्याच्या संध्याकाळी काही क्षण मनाेरंजनाचे:विजिकिषा नाट्य अकादमीच्या कलाकारांचे वृद्धाश्रमात माेफत नाट्य प्रयाेग

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणाला मुलेच नाहीत तर कोणाची मुले परदेशात राहतात, काेणी स्वत:च मुलांकडे राहत नाहीत तर काेणीच्या मुलांना घरात पालकच नकाे म्हणून त्यांनी आई-वडिलांना वृद्धाश्रमात आणून साेडले. अनेक वृद्धांच्या डाेळ्यांत हे दु:ख लपून राहत नाहीत. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळचे काही क्षण मनाेरंजनाचे जावे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून नाशिकमधील कलाकार थेट वृद्धाश्रमातच नाटकाचे प्रयाेग करत आहेत. या सर्व आजी-आजाेबांपुढे विनाेदी नाटकाच्या प्रयाेगातून ते घटकाभर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करत आहेत.

नाशिकच्या विजिकिषा नाट्य अकादमीचे तब्बल 20 कलाकार विक्रम गवांदे लिखित, दिग्दर्शित लालबागची चाळ हे विनोदी नाटक शहरातील विविध वृद्धाश्रमात विनामुल्य करत आहेत. एका चाळीची आणि त्या चाळीतील नवरा-बायकाेची विनाेदी गोष्ट या नाटकातून दाखविण्यात येते. ती बघताना वृद्धाश्रमातील आजी-आजाेबा पोट धरून हसतात, त्यांच्या चेहऱ्यावरील ताे आनंद आपण त्यांच्यासाठी किंबहुना समाजासाठी खारीचा वाटा उचलल्याचे समाधान देताे असे हे कलाकार सांगतात.

येथे झाले प्रयाेग

मानव मंदिर वृद्धाश्रम, माताेश्री वृद्धाश्रम, वात्सल्य वृद्धाश्रम, सहारा केअर सेंटर, मुरलीधर मंदिर

ही अनाेखी नाट्यसेवा

विक्रम गवांदे, महेंद्र कापडणे, पूजा घाेडके, साईप्रसाद शिंदे, पंकज रायते, सुनील पालझडे, अनंता आहेर, मधुरा तरटे, संजीव चाैधरी, जयेश काेळी, सूर्यकांत शिंपी, सुनंदा आहेर, रवींद्र नायर, श्रद्धा कुलकर्णी, अक्षय निकम, कविराज व्यवहारे, गीता शिंपी, अपूर्वा देशपांडे, स्वराली गर्गे, अंकिता मुसळे

जाणीवेतून कल्पना

काेविड काळानंतर जगण्याचे आयाम बदलले. अनेकांच्या जगण्यात एकटेपणा आला. मी स्वत: माझ्या आजी-आजाेबांच्या खूप जवळ होतो. त्यामुळे ती जाणीव होती. म्हणूनच या नाटकाचे फक्त वृद्धांसाठीच विनामुल्य प्रयाेग करण्याचे मनात हाेते. माझ्या टीमला सांगितले त्यांना तर कल्पना फारच आवडली. आतापर्यंत 5 ठिकाणी प्रयाेग झाले आहेत. आता पुणे आणि मुंबईतील काही वृद्धाश्रमातही प्रयाेग आहेत. प्रयाेग झाल्यावर हे आजी-आजाेबा जेव्हा त्यांचे अनुभव सांगतात तेव्हा डाेळ्यांच्या कडा ओलावतात. - विक्रम गवांदे, लेखक, दिग्दर्शक

बातम्या आणखी आहेत...