आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीत आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अवैध-वैध मतपत्रिकांवरून अपक्ष उमेवार सत्यजित तांबे आणि महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या समर्थकांमध्ये आक्षेप घेण्यात आल्याने गाेंधळ निर्माण झाला आहे. या प्रकाराने मतमाेजणी केंद्राच्याआवारात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तातडीने विभागीयआयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्य राखीव पाेलिस दलाच्या तुकड्या पाचारण करण्यातआल्याने तणाव निवळला.
दुपारी मतमोजणीला सुरुवात
आज दुपारी अडीचच्या सुमारास पहिल्या फेरीला मताेजणीची सुरुवात झाली. प्रत्येक टेबल वरती हजार मतपत्रिका अशाप्रमाणे 28 टेबल वरती पहिल्या फेरीत 28 हजार मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे .प्रत्येक उमेदवाराला पडलेले पहिल्या पसंतीची मत त्यांच्या त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
बाद मतपत्रिकेची संख्या अधिक
पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यातील पहिल्या काही मतपत्रिकांचा अंदाज घेतला असता तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यामध्ये अटी त्याची लढत होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. दरम्यान बाद मतपत्रिकांची संख्या ही अधिक असल्याने आता कोटा किती निश्चित होतो याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे कोटा निश्चिती नंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल
नाशिक पदवीधर मतदार संघ :
उमेदवारांची गैरहजेरी ; समर्थकांकडून जल्लाेष
सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात सुरूवातीला अटीतटीची लढत असल्याचे दिसत होतं, पण जसे जसे गठ्ठे मोजले जात आहेत, तसे तांबे पुढे असल्याचे चित्र पहावयास मिळाले. दाेन्ही ही उमेदवार सायंकाळपर्यंत मतमाेजणी केंद्रावर उपस्थित झालेले नव्हते. याठिकाणी त्यांचे समर्थक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. दरम्यान, तांबे समर्थकांना निकाल लागण्यापुर्वीच केंद्राच्या बाहेर विजयाच्या घेाषणा देत जल्लाेष केल्याने पेलिसांनी त्यांच्यावर कारवाई करताच त्यांना बाहेर काढण्यातआले. तर शुभांगी पाटील ह्या त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.
आतापर्यंतचे अपडेट्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.