आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik | Face Document Case | Marathi News | Nashik Latest Update | Attempt To Export Goods Worth Rs 21 Crore Using Forged Documents; Agent Arrested With Two Traders In Nashik

आरोपींना पोलिस कोठडी:बनावट दस्तऐवज वापरून 21 कोटींचा माल निर्यातीचा प्रयत्न; नाशकात दोन व्यापाऱ्यांसह एजंट अटकेत

नीलेश अमृतकर | नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशकातील जानाेरी येथून विदेशात कपड्यांसह पर्स व इतर उत्पादित २१ काेटी रुपयांचा माल कंटेनरद्वारे निर्यात करताना कंपनीने अनुदान मिळवण्यासाठी बनावट दस्तऐवजाचा वापर केल्याचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या तपासणीत उघडकीस आला. विशेष म्हणजे, पथकाने नाशकातून दाेघा व्यापाऱ्यांसह एका एजंटला अटक करत त्यांनी १ काेटी ७१ लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी ही फसवणूक केल्याचे आराेप ठेवले आहेत.

केंद्रीय सीमा शुल्कच्या नागपूर विभागाच्या गुन्हा अन्वेषणअंतर्गत नाशिकच्या सेवा व वस्तू कर (जीएसटी) उपायुक्तांच्या पथकाने संशयित तिघांना अटक करून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. के. गावंडे यांच्यासमाेर हजर केले. यात संशयित संताेष देवराम सकपाळ, सागर देवराम सकपाळ (रा. कुर्ला, मुंबई) यांच्यासह एजंट ज्ञानेश्वर दिनकर वाफरे (रा. पनवेल) यांचा समावेश आहे.

या तिघांना न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली. त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यात सीमाशुल्क व जीएसटीकडून विशेष सरकारी वकील शशिकांत दळवी यांनी युक्तिवाद केला. संशयितांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे व अॅड. सूरज मंत्री यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...