आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा कोलमडला:अवकाळीच्या तडाख्याने कांद्याच्या दरात घसरण; नाशिकच्या शेतकऱ्याने केला कांद्याचा अंत्यविधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा चांगलाच कोलमडून पडला आहे. पावसामुळे नाशिक जिल्ह्यातला कांदा सडून गेला आहे. या पार्श्वभूमीवर वैतागलेल्या शेतकऱ्याने कांद्याचाच अंत्यविधी केल्याची घटना समोर आली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस धो-धो कोसळत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. सततच्या पावसामुळे खरीपानंतर रब्बी हंगामातील‎ पिकांचेही नुकसान होत असून,‎ अनेक वर्षांपासून फळबागांची निगा‎ राखून आता गारपीट व अवकाळी‎ पावसामुळे फळांची हानी होत आहे.‎ जिल्ह्यात शनिवारी झालेल्या‎ पावसामुळे 400 हेक्टर क्षेत्रावरील‎ पिके आणि फळबागांची हानी‎ झाल्याचे प्राथमिक पाहणीवरून‎ रविवारी पुढे आले आहे.

कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट केला

पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा अंत्यविधी केला आहे. योगेश सोनवणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा सडला आहे. बाजारात कवडीमोल भावाने विकला जाणारा हा कांदा पाहून योगेश सोनवणे या शेतकऱ्याने कांद्यावर अंत्यसंस्कार करत कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट केला आहे.

कर्ज वसुली तूर्त थांबवा

जिल्ह्यात गत आठवड्यापासून‎ अवकाळी पाऊस सुरू आहे.‎ अवकाळी पावसाचा मुक्काम आता‎ 5 मे पर्यंत लांबणार आहे. विजांच्या‎ कडकडाटासह पाऊस होईल, अशी‎ शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान‎ विभागाने वर्तवली आहे. ताशी 40-50‎ कि.मी. वेगाने वारा वाहण्याची‎ शक्यता आहे.‎ या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, सक्तीची वीजबिल आणि कर्ज वसुली तूर्त थांबवावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.