आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या जिंदाल कंपनीत स्फोट, 2 ठार:मुख्यमंत्र्यांनी केली जखमींची विचारपूस, मृतांना 5 लाखांची मदत जाहीर

नाशिकएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहचले असून त्यांनी जखमींची चौकशी केली. या जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार आहे.

घटनेची चौकशी, मृतांच्या वारसांना 5 लाख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इगतपुरीत पोहचले. त्यानंतर जिंदाल कंपनीतील स्फोटातील जखमींची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देताना जिंदाल कंपनीतील दुर्घटना मोठी असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की, मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.

दादा भुसेंची प्रतिक्रीया

मंत्री दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना दर अर्ध्या तासाने आम्ही अपडेट देत आहोत. काही अंतरापर्यंत आपण गेलो परंतु खूप आत जाण्यावर बंधने घालण्यात आली आहे. कारण तेथे केमीकल टॅंक असल्याने स्फोट होण्याची शक्यता आहे. आग आटोक्यात आणणे व जखमींवर उपचार याला प्राधान्य दिले जात आहे.

आधी जीव वाचवू - भुसे

दादा भुसे म्हणाले, आग आटोक्यात आणण्यासाठी जेथून अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध होतील त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधी आग आटोक्यात आणण्याला प्राधान्य देऊ. त्यानंतर या घटनेची सविस्तर माहिती बघुया.

बार्शी तालुक्यात फटाका कारखान्यात स्फोट!:3 महिला कामगार ठार, कारखाना जळून खाक, पांगरी-शिराळे मार्गावरील भीषण घटना

बार्शी (जि. सोलापूर तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावरील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास शिराळे पांगरीदरम्यान घडली. हा स्फोट मणियार यांच्या फटाक्यांच्या कारखान्यात झाला. या भीषण आगीत कारखान्याची राखरांगोळी झाली. या घटनेत कारखान्यातील एक महिला कर्मचारी ठार झाली, तर अनेक कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (येथे वाचा सविस्तर)

 • आगीच्या घटनेबाबत रेस्क्यु ऑपरेशन केले जात आहे.
 • एसपीसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत.
 • चौदा लोक आतापर्यंत सुखरुप असून एका महिलेचा मृत्यू.
 • जखमींशी प्रशासनाकडून विचारपुस
 • फोम टेंडरद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे.
 • ठाण्याकडूनही फायर टेंडर्सचा संपर्क सुरु आहे. नवीन वर्षामुळे आज प्लाॅंटमध्ये संख्या कमी होती.
 • आग स्फोट झाल्याने लागली.
 • लोकांचे जीव वाचावणे यालाच आधी महत्व
 • रेस्क्यु मॅनेजमेंट प्लॅनची तयारी
 • कंपनी परिसरात आजुबाजूला गवत असल्याने आग एकीकडून दुसऱ्या बाजूला जात आहे.
 • आग आटोक्यात आणुन लोकांना बाहेर काढणे त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करणे यालाच प्राधान्य
 • एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरु

आकाशात धुराचे लोळ

स्फोटानंतर आकाशात धुराचे व आगीचे लोळ दूरवरूनही पाहायला मिळत होते. आगी एवढी जास्त होती की, धूर सर्वत्र पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,15 रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील 11 जणांना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले अजून 2 जण अडकले असल्याची माहिती आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य करण्याचे प्रयत्न सुरू असून मी कायम जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

महत्त्वाचे

 • सकाळी 9.30च्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली
 • 20 ते 25 गावांत स्फोटाचे मोठे बसले हादरे
 • हजारो कामगार कंपनीत काम करतात
 • जिंदाल पॉलिफिल्म्स ही आशिया खंडातील पॉलिफिल्म्स बनवणारी मोठी कंपनी आहे.
 • नाशिकच्या गोंदे गावातील ही घटना आहे.
 • मुख्यमंत्री सिल्लोडची सभा रद्द करून तातडीने इगतपुरीकडे रवाना

आग विझविण्यासाठी मोठ्या अडचणी

आग लागलेल्या शाफ्ट जवळ अवघ्या 150 मीटर अंतरावर मोठी इंधन टॅंक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास 20 हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्यानं अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहे.

या आगीमध्ये 35 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी आगीत कितीजण अडकले याबाबत नेमका आकडा समोर आलेला नाही. अग्निशमन दलाचे 8 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात या कर्मचाऱ्यावर दोन कक्ष राखीव ठेवण्यात आलेले आहे.

स्फोटानंतर रहिवाशांत भीतीचे वातावरण

कंपनीतील केमिकल स्टोरेजला आग लागली आहे. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. 11 जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. औद्योगिक वसाहती नियमितपणे कामकाज सुरू असताना अचानकपणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही आग लागली.

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या घरातील खिडक्यादेखील हादरल्या. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या आगेची घटना समजतात अग्निशामक दलाचे बंब, वाडीव्हरे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही.

जिंदाल पॉलिफिल्म्समध्ये 1 हजारांहून अधिक कामगार आहेत. यात काही महिलांचाही समावेश आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली, यानंतर अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी अग्निशमनल दलाच्या 14 गाडया दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...