आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाची बातमी:नाशिककरांना इंदोर, हैद्राबादसाठी 1 जुनपासून विमानसेवा, इंडिगोकडून तिकीट बुकिंग सुरू

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. १ जुन पासून इंदुर, हैद्राबाद या शहरांकरीता विमानसेवा सुरू हाेत असून अहमदाबाद करीता दुसरी फ्लाइटही सुरू हाेत आहे.

देशातील सर्वात व्यावसायिक प्रवासी विमान कंपनी मानल्या जाणाऱ्या इंडिगाेकडून याकरीता गुरुवारी तिकिट बुकिंग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आठवड्यातील सर्व दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल.

कसे असेल वेळापत्रक?

हैदराबाद येथून सकाळी ११.३० वाजता टेकऑफ तर नाशिक विमानतळावर १२.३० वाजता हे फ्लाईट पोहोचेल. नाशिक येथून दुपारी २.४५ वाजता हैदराबाद साठी टेकऑफ होईल आणि ४.३० वाजता तेथे पोहोचेल. इंदूर येथून दुपारी १.१५ वाजता नाशिक साठी हे विमान रवाना होईल ते नाशिक विमानतळावर २.२५ वाजता पोहोचेल. नाशिक येथून दुपारी १२.५० वाजता इंदूरसाठी विमान उड्डाण घेईल आणि इंदूर विमानतळावर दुपारी २ वाजता पोहोचेल. आमदाबाद हुन नाशिक साठी सकाळी ८ वाजता निघेल तर नाशिक विमानतळावर ९.२५ वाजता पोहोचेल. नाशिकहून सकाळी ९.४५ वाजता अहमदाबाद साठी निघेल आणि आमदाबाद येथे ११.०५ वाजता पोहोचेल.

प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद

सध्या, नाशिक विमानतळावरून नागपूर, अहमदाबाद, गाेवा या मार्गांवर इंडिगाे नियमित सेवा देत असून प्रवाशांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताे आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वी, मेंटेनन्समुळे फ्लाइटस‌्च्या उपलब्धते अभावी, स्पाइस जेटकडून अचानक दिल्ली आणि हैद्राबादची सेवा स्थगित करण्यात आली हाेती, जनभावना लक्षात घेत कंपनीने आठवड्यातून तीन दिवस दिल्ली करीता विमानसेवा सुरू केली असली तरी हैद्राबादची सेवा बंद आहे. आता इंडिगाे या मार्गावर विमानसेवा देणार असल्याने नाशिककरांची कनेक्टिव्हिटी या शहराकरीता पुन: स्थापित होणार आहे.

स्टार एअरच्या सेवेची मात्र प्रतीक्षाच

संजय घोडावत ग्रुपचा स्टार कडून नाशिक बेळगाव पुणे विमानसेवा यापूर्वी दिली जात होती मात्र अचानक काही महिन्यांपूर्वी कंपनीने ही सेवा बंद केली. यानंतर लोकप्रतिनिधींनी थेट नागरी विमान उड्डेन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे यासंदर्भात सेवा पुरवत सुरू करण्याची मागणी केल्यानंतर स्टार एअर ने फेब्रुवारीपासून सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्यापही सेवा सुरू झालेली नाही याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.