आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस बुधवारी दि. २२ शहरात जाेरदार बरसरला. मात्र या पावसाने पालिकेसह स्मार्टसिटीच्या वतीने केलेेले निकृष्ट कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील मेनराेड, दहिपूल, अशाेक स्तंभ, गंगापूर राेड परिसरात माेठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचले हाेते. या प्रकारामुळे काेट्यवधी रुपये खर्च करत स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेवरच नागरिकांकडून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरात पालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने भुमिगत गटारीचे काम करण्यासाठी खाेदकाम करण्यात आले हाेते.तसेच त्र्यंबकराेड ते अशाेक स्तंभ परिसरात तब्बल 24 काेटी रुपये खर्च करत स्मार्ट राेड देखील साकारण्यात आला. मात्र बुधवारी पडलेल्या पहिल्याच पावसाळ्यात या स्मार्टराेडवरील ड्रेनेज ओव्हर फ्लाे झाल्याने रस्त्यावर पाणी वाहत असल्याची परिस्थिती बघावयास मिळत हाेती. अशीच काहीशी परिस्थिती दहीपूल, हुंडीवाला लेन, सराफ बाजारत परिसरात देखील निर्माण झाली हाेती. पावसाच्या पाण्याचा निचराच हाेत नसल्याने या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांना साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माेठ्या अडचणींचा सामना करावा. पहिल्याच पावसात शहरात अशा प्रकारे ठिकठिकाणी पाणी साचून तळे बनल्याने पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
पालिकेविरोधात व्यापाऱ्यांचा रोष
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी खाेदकाम करण्यात आलेले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातील शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने स्मार्ट सिटीने नेमके काेणते काम केले, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी काय उपाययाेजना केल्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.तर दुसरीकडे पालिकेच्या वतीने देखील पावसाळ्यापूर्व काेणतेही काम न केल्याने अशी परिस्थिती उदभवली असल्याने पालिका आयुक्त तथा प्रशासकांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उपाययोजना करण्याची गरज
शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दहिपूल,मेनराेड परिसरासह अशाेक स्तंभ परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना बुधवारी माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला. असे प्रकार पुन्हा हाेवू नये यासाठी अधिकाऱ्यंानी तातडीने उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आढावा घेत आहेत
मेन रोड अर्धापूर परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा का होऊ शकला नाही याबाबत आढावा घेत आहेत पुन्हा अशा अडचणी निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील - सुमंत मोरे, सीईओ, नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.