आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिकच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील विविध क्लब, अकॅडमी यातील फुटबॉल खेळाडू यांच्यासाठी फुटबॉल प्रीमियर लीगचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर करण्यात आले होते. यात 170 मुले आणि 75 मुली खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व मॅचेस या साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात आल्या. मुलांच्या फुटबॉल वॉरियर्स विरुद्ध नाशिक फुटबॉलर्स यांच्यात अटीतटीच्या अंतिम सामन्यात नाशिक फुटबॉलर संघाने विजेतेपद पटकावले.
विजेत्या संघास चषक, मेडल्स आणि रोख रक्कम रुपये 11000 तर उपविजयी नाशिक वॉरियर्स या संघास चषक, मेडल्स आणि रोख रक्कम रुपये 7000 देऊन गौरविण्यात आले. तर मुलींच्या संघामध्ये एनएफसीसी विरुद्ध शाहू एफसी यात अंतिम झाला यात एनएफसीसी संघाने प्रीमियर लीग विजेतेपद संपादन केले या संघास चषक, मेडल्स आणि रोख रक्कम रुपये 3000 तर उपविजयी शाहू एफसी या संघास चषक, मेडल्स आणि रोख रक्कम रुपये 2000 देऊन गौरविण्यात आले.
पंच म्हणून गौरव कडलग, किशोर बोरसे, मंगेश शर्मा, शक्ती गाडेकर, गगन सिंग, प्रतीक नैनवाल यांनी काम पाहिले. प्रीमियरचे प्रमुख म्हणून बी. डी. रॉय यांनी आपली भूमिका पार पाडली स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी संघटनेचे खजिनदार सुनील ढगे अनिल जाधव मुकुंद झनकर सर्वेश देशमुख आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.