आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नव्याने इनकमिंग सुरू झाले असून माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुदाम काेंबडे यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. दरम्यान, काेंबडे यांना शहराध्यक्षपदी बढती देण्याची शक्यता आहे.
मनसेतून भाजपत गेलेले काेंबडे यांचा सुदाम डेमसे यांनी पालिका निवडणुकीत पराभव केल्यानंतर ते राजकीय विजनवासाचा सामना करत हाेते. मात्र, दातीर यांचे शहराध्यक्षपद गेल्यानंतर शहराचा अनुभव असलेले अाणि पूर्वी ग्रामीण जिल्हाध्यक्षपद भूषविलेले सुदाम काेंबडे यांनी मनसेत घरवापसी केली.
त्यांच्यासह इंदिरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप जगझाप, गणेशवाडीतील भूषण शिरसाठ, कुणाल देवरे यांनीही मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम (मामा) शेख, जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनोज घोडके आदी उपस्थित हाेते.
दरम्यान मनसे साेडून अन्य पक्षांत गेल्यानंतर ज्यांची वाताहात झाली, असे अनेक माजी नगरसेवक वा पदाधिकारी आता पुन्हा पक्षाच्या वाटेवर असल्याचे बाेलले जाते. मनसे कामगार सेना अध्यक्षपदाचे पत्र सलीम शेख यांनाे देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सलीम मामा शेख यांची महानगरपालिका कर्मचारी कामगार सेनेच्या नाशिक अध्यक्षपदी निवड झाली यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, दिलीप दातीर, नगरसेवक योगेश शेवरे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष शहाणे, सरचिटणीस अमित गांगुर्डे, संजय देवरे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर , माथाडी कामगार सेनेचे चिटणीस वैभव महिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुर्तडक यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद?
माजी महापाैर अशाेक मुर्तडक हे जुनेजानते असून त्यांचा राजकीय अनुभवही माेठा अाहे. ही बाब लक्षात घेता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी एक गट अाग्रही असल्याचे समजते. त्यातून पक्षात निष्ठावंताना न्याय मिळताे हाही संदेश जावू शकताे असाही दावा केला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.