आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांनो कोठे कराल बाप्पांचे विसर्जन?:महापालिकेने केली 27 नैसर्गिक, तर 43 कृत्रिम तलावांची सोय; 16 जीवरक्षक तैनात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये गणेश विसर्जनासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. बाप्पांना निरोप देण्यासाठी 29 नैसर्गिक व पारंपरिक ठिकाणी, तर नदीप्रदूषण टाळण्यासाठी 43 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पावसामुळे नदी - नाल्यांची पाणीपातळी वाढल्याचे बघून 16 जीवरक्षक अनूचित प्रकार राेखण्यासाठी तैनात असणार आहेत.

यंदा जल्लोषात उत्सव

गेल्या दाेन वर्षात कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेशाेत्सव जल्लाेषात साजरा करता आला नव्हता. मात्र, यंदा केराेनानंतर पहिल्यांदाच नाशकात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात असून पालिकेने भाविकांची गैरसाेय हाेणार नाही व उत्साहाला गालबाेट लागणार नाही यापद्धतीने नियाेजन केले आहे. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

विभागनिहाय नैसर्गिक तलाव

नाशिकपूर्व-लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी-गोदावरी संगम, नाशिकरोड- दसक घाट, चेहडी गाव दारणा नदी, देवळाली गाव, विहित गाव, वडनेर गाव(वालदेवी नदी), पंचवटी- म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा, नवीन नाशिक - पिंपळगाव खांब वालदेवी घाट, नाशिक पश्चिम- यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर पटांगण, सिध्देश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट, सातपूर- गंगापूर धबधबा, गंगापूर अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी.

विभागनिहाय कृत्रिम तलाव

नाशिक पूर्व- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, रामदास स्वामी नगर लेन १, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक राजसारथी, नाशिकरोड- नारायण बापू चौक, चेहडी ट्रक टर्मिनल, निसर्गोपचार केंद्र जयभवानी रोड, शिखरेवाडी ग्राऊंड, गाडेकर मळा, मनपा शाळा क्रमांक 125 मैदान, राजराजेश्वरी चौक, के. एन. केला शाळेमागील प्रस्तावित भाजीमार्केट. पंचवटी- राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कार्यालय पेठरोड, कोणार्कनर, प्रमोद महाजन उद्यान, रामवाडी जॉगींग ट्रॅक शेजारी, नवीन नाशिक- गोविंद नगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ जुने सिडको, पवननगर जलकुंभ, राजे संभाजी स्टेडिअम, मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा, डे केअर शाळा राजीवनगर, राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ कर्मयोगीनगर, नाशिक पश्चिम- चोपडा लॉन्स पुल गोदापार्क, चव्हाण कॉलनी परीची बाग, फॉरेस्ट नर्सरी गंगापूररोड, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोंदे पूल उंटवाडीरोड, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब पंडित कॉलनी, शीतलादेवी टाळकुटेश्वर मंदिर, सातपूर-पाईपलाईन रोड रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, शिवाजीनगर धर्माजी कॉलनी, अशोकनगर पोलिस चौकी, नंदिनी नासर्डी नदी पूल सातपूर अंबड लिंकरोड, नंदिनी नासर्डी नदी पूल आयटीआय पूल, शिवाजीनगर पाझर तलाव.

बातम्या आणखी आहेत...