आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यात आज भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त नाशिक शहरातून सांयकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १०० गावांमधील ५०० श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.गोल्फ क्लब मैदान येथे महाबौध्द धम्म परिषद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
गौतम बुद्धांच्या 100 मूर्त्या
यासंदर्भात माहिती देताना मोहन आढांगळे यांनी सांगितले की, सम्राट अशोक जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान बुध्द जयंती तथा बुद्ध पौर्णिमा यानिमित्त दि. २३ एप्रिल ते २ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात १०० गावातील प्रत्येकी ५ उपासक हे श्रामनेर झाले असून सुमारे ५०० श्रामनारांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या दरम्यान जिल्ह्यात विविध तालुक्यांमधील १०० गावांना भगवान बुद्ध यांच्या १०० मूर्ती प्रदान करण्यात आल्या.
१०० रथांची भव्य मिरवणूक
या मिरवणूकीत नाशिक, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सटाणा, कळवण, निफाड, देवळा आदि तालुक्यांचा समावेश आहे. या १०० मूर्ती या प्रत्येकी साडेपाच फूट उंच असून फायबर मेटल पासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या आहेत. या बुद्ध मूर्ती प्रदान सोहळ्यानिमित्त दि. २ मे रोजी नाशिक शहरातून १०० बुद्ध मूर्तींची रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या छोटा हत्ती वाहन म्हणजेच १०० रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत
सांयकाळी ५ वाजता तपोवनातून भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब येथे आली. दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदिंसह पंचशील ध्वजाचे प्रतिक असलेल्या छात्री हाती घेऊन शेकडो श्रामनेर आणि पांढरे वस्त्र परिधान केलेले हजारो स्त्री - पुरुष, समाज बांधव सहभागी झाले होते.
गोल्फ क्लब येथे मिरवणुकीचे रूपांतर श्रामनेर शिबिर तथा प्रबोधन सभेत झाले. मोहन आढांगळे, प्रदीप पोळ, सचिन वाघ, राहुल बच्छाव, डी.एम. वाकळे, के.के. बच्छाव , वाय.डी.लोखंडे, संजय भरीत, आर.आर.जगताप, पी.डी.खरे, अशोक गांगुर्डे, सोमनाथ शार्दुल, शिवाजी काळे, अजिंक्य जाधव आदिसह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.