आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संमेलन गीताला सूर सापडेना; लाेकहितवादी गाेपाळ हरी देशमुख समजून नाना शंकरशेठ यांचे छायाचित्र!

प्रतिनिधी | नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुगलवर गंडले, साहित्य संमेलनामागील शुक्लकाष्ठ संपेना

ज्या संस्थेने मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रकपद घेतले ती संस्था ज्यांच्या नावाने आहे. अशा लाेकहितवादी गाेपाळ हरी देशमुख यांच्याऐवजी साहित्य संमेलन गीतात नाव लाेकहितवादींचे आणि छायाचित्र मात्र नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे घातल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

नाशकात ३ ते ५ डिसेंबरदरम्यान लाेकहितवादी मंडळ निमंत्रक असलेले ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेत आहे. संमेलन गीतात आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच नव्हते. अनेकांनी आक्षेप घेतल्यावर हे नाव घालण्यात आले.

आता गीताच्या व्हिडिओत लाेकहितवादी गाेपाळ हरी देशमुख यांचा ‘जनस्थान हे कर्मवीरांचे, लाेकहितवादाचे’ या ओळीसह अगदी शेवटी उल्लेख येताे. त्यात मात्र मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्याेगपती व मुंबईच्या जडणघडणीत माेठा वाटा असलेल्या नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे छायाचित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्यातील काही छायाचित्रे गुगलवरून घेण्यात आली आहेत.

कपाळीचा गंध, पगडी, मिशांत फरक असूनही घोडचूक
गुगलवर लाेकहितवादी गाेपाळ हरी देेशमुख असे सर्च केले असता दुसऱ्या क्रमांकावर नाना शंकरशेठ यांचे छायाचित्र येते. तेच या गीतात घेतल्याचे दिसते. प्रत्यक्षात लाेकहितवादी यांच्या कपाळी गंध आहे, पगडी थाेडी वेगळी असून त्यांच्या मिशाही नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्यासारख्या नाहीत. तरीही केवळ गुगलवरून फाेटाे घेऊन ताे गाण्यात तसाच वापरला आहे.

बातम्या आणखी आहेत...